ETV Bharat / state

माहिम, कल्याणनंतर आता पनवेलमध्ये आढळली मृतदेह असलेली बॅग - बॅगमध्ये सापडला मृतदेह ठाणे

पनवेलमधल्या गाढी नदीच्या किनारी एक बॅग आढळुन आल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बॅग तपासली. यामध्ये 30 ते 35 वय असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

dead-body-in-bag-found-in-thane
माहिम, कल्याणनंतर आता पनवेलमध्ये आढळली मृतदेह असलेली बॅग
author img

By

Published : Dec 10, 2019, 7:56 AM IST

Updated : Dec 10, 2019, 11:22 AM IST

पनवेल- पनवेलमधल्या गाढी नदीच्या खाडीत एक मृतदेह भरलेली बॅग सापडली आहे. यामधील व्यक्तीचे वय 30 ते 35 वर्ष असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून हा मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे.

हेही वाचा- कांदे स्वस्ताईकडे, प्रति क्विटंल तीन ते साडेतीन हजार रुपयांची घसरण

पनवेलमधल्या हरिग्रामजवळच्या गाढी नदीच्या किनारी एक बॅग आढळुन आल्याची माहिती पनवेन तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बॅग तपासली. यामध्ये 30 ते 35 वय असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह एका काळसर रंगाच्या रेक्झिन बॅगेत आढळून आला. या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेत गुंडाळून गाढी नदीत फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, निघृणपणे ही हत्या कोणी आणि का केली? तसेच ही व्यक्ती कोण आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा पोलीस तपास करत आहेत. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणखी मदत मिळेल.

दरम्यान, गेल्या आठवड्यात माहिम येथील बीचवर अशाच प्रकारे एक सुटकेस आढळली होती. या सुटकेमध्ये एक मृतदेह आढळला होता. एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले होते. त्यानंतर लगेचच कल्याण स्टेशन परिसरात एका महिलेचे शिर आणि धड गायब असलेला मृतदेह सापडला. त्यापाठोपाठ आता पुन्हा पनवेलमध्ये ही असाच धक्कादायक प्रकार घडला असून पनवेलमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

Intro:कृपया फाईल फोटोवर बातमी लावावी
पनवेल

गेल्या दोन दिवसांआधी माहिमच्या बीचवर सुटकेसमध्ये आणि नंतर कल्याण स्टेशनची घटना ताजी असतानाच आता पुन्हा पनवेल परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधल्या गाढी नदीच्या खाडीत 30-35 वर्षीय इसमाचा मृतदेह भरलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून हा मृतदेह रुग्णालयात धाडला आहे. Body:पनवेलमधल्या गाढी नदीच्या किनारी एक बॅग आढळुन आल्याचा फोन कंट्रोल रूमला आला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॅग तपासली. यामध्ये 30 ते 35 वय असलेल्या एका इसमाचा मृतदेह आढळुन आला. या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेत गुंडाळून गाढी नदीत फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून निघृणपणे हत्या कोणी आणि का केली? तसेच ही व्यक्ती कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत पोलीस अधिक तपास करत आहेत. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणखी मदत मिळेल.
Conclusion:गेल्या आठवड्यात मुंबीतील माहीम येथील बीचवर अशाच प्रकारे एक सुटकेस आढळली होती. या सुटकेमध्ये एक मृतदेह आढळला होता. एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले होते. त्यानंतर लगेचच कल्याण स्टेशन परिसरात एका महिलेचे शिर आणि धड गायब असलेला मृतदेह सापडला. त्यापाठोपाठ आता पुन्हा पनवेलमध्ये ही असाच धक्कादायक प्रकार घडला असून पनवेलमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.
Last Updated : Dec 10, 2019, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.