ETV Bharat / state

अरबी समुद्रात वादळ सदृष्य परिस्थिती; मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन - रायगड न्यूज

हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार 14 ते 16 मे यादरम्यान 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्‍यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

रायगड
रायगड
author img

By

Published : May 12, 2021, 10:14 PM IST

रायगड - भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वादळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडातील समुद्र व खाडी किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे. तर जिल्हा यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आपत्ती प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहेत.

अरबी समुद्रात वादळ सदृष्य परिस्थिती

मच्छीमाराना खोल समुद्रात जाण्यास बंदी -

हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार 14 ते 16 मे यादरम्यान 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्‍यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळाने गेल्यावर्षी केले होते नुकसान -

3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याला हानी पोहचवली होती. निसर्ग चक्रीवादळाने हजारो कोटीचे नुकसान झाले होते. अनेक कुटूंब या वादळात उध्वस्त झाली होती. वेळीच प्रशासनाने अनेक समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुस्थळी हलविल्याने अनेकांचे प्राण वाचले होते. पुन्हा 14 ते 16 मे दरम्यान वादळाची शक्यता दिली असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश -

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ किनार्‍यावर येण्याची शक्यता विचारात घेऊन सर्व विभागांना आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. वूडकटर, जेसीबी, बॅटरी, जनरेटर, शोध व बचाव पथक आदी तत्पर ठेवण्यात यावे, वादळ व अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आपल्या आदेशात जारी केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.