कर्जत - कर्जतमधील भिसेगाव येथे गोरक्षक मयुरेश सुदाम चौधरी ( Cow birthday celebration at Bhisegaon in Karjat ) यांच्या लाडक्या गौरी गायीचा 10 वा वाढदिवस ( Cow birthday celebration ) मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. दरवर्षी गौरीचा वाढदिवस चौधरी कुटुंबीय आपल्या मित्र मंडळींसह मोठ्या उत्साहात साजरा करतात. समाजामध्ये गायीबद्दल आदर, प्रेमभावनेसह जनजागृती व्हावी तसेच गोसंवर्धन व गोरक्षण व्हावे या हेतूने हा सोहळा दरवर्षी नित्यनेमाने साजरा केला जातो.
आपल्या घरी एक तरी गाय पाळावी - तसेच गोपालन केल्यामुळे गायीचे शेण, गोमूत्र हे अतिशय लाभदायक ठरते. तर, त्याचा उपयोग हा प्रत्येक गावागावात घरोघरी केला जात असल्याचे गोरक्षक मयुरेश चौधरी सांगतात. प्रत्येकाने आपल्या घरी एक तरी गाय पाळावी असे आवाहन या सोहळ्यानिमित्त चौधरी कुटुंबीयांनी केले आहे. केवळ गौरीच्या वाढदिवसापुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून या निमित्ताने गोसंवर्धन तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात येतो.
वाढदिवसानिमित्त गोड जेवणाची मेजवानी - गौरी गायीच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सर्वांना गोड जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली. गौरीच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नवी मुंबई वाशी येथील उद्योजक सुनील हंसकृष्ण खन्ना, ह.भ.प. भरत महाराज देशमुख, बजरंग दल संयोंजक साईनाथ श्रीखंडे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे तसेंच गोशाळचे जैन बांधव, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी गोरक्षक बांधवांसह भिसेगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.