ETV Bharat / state

कोरोनाचे संकट : ज्वेलर्स दुकानदारावर चरितार्थ चालविण्याकरता कांदे विकण्याची वेळ - Raigad corona updated news

टाळेबंदीच्या नियमामुळे पाली शहरातील ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. दुकानात लाखोंचे सोन्याचे दागिने असतानाही कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सराफा दुकानात कांदे व फळे विकण्याची वेळ नाकोडा ज्वेलर्सचे मालक रवी ओसवाल यांच्यावर आली आहे.

सराफ दुकानातून कांद्याची विक्री
सराफ दुकानातून कांद्याची विक्री
author img

By

Published : May 25, 2020, 4:53 PM IST

Updated : May 25, 2020, 5:08 PM IST

रायगड - कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्र आणि व्यवसायिकांना बसत आहे. जिल्ह्यातील ज्वेलर्स दुकानांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्नसराई, गुढीपाडवा, दसरा, अक्षयतृतीय या सणांमध्ये रोज लाखो रुपयांची उलाढाल दुकानात होत असते. हे उत्पन्न बुडाल्याने जिल्ह्यातील एका ज्वेलर्स दुकानदाराने कांदे विकण्यास सुरुवात केली आहे.

ज्वेलर्स दुकानदारावर चरितार्थ चालविण्याकरता कांदे विकण्याची वेळ

टाळेबंदीच्या नियमामुळे पाली शहरातील ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. दुकानात लाखोंचे सोन्याचे दागिने असतानाही कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सराफा दुकानात कांदे व फळे विकण्याची वेळ नाकोडा ज्वेलर्सचे मालक रवी ओसवाल यांच्यावर आली आहे.

हेही वाचा-सुस्साट! हजार एचडी चित्रपट सेकंदात डाऊनलोड करणारी चिप विकसित

कोरोना संकटात सर्व बाजारपेठा बंद असल्याने ज्वेलर्सला फटका बसला आहे. लग्नसराई हंगाम असूनही कोरोनामुळे लग्न हे घरगुती कार्यक्रमात पार पडत आहेत. तर अनेक लग्नसोहळे पुढे ढकलण्यात येत आहे. सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ज्वेलर्स दुकानदार हा आर्थिक अडचणीत आला आहे. आपले आणि आपल्या कुटूंबाचे पोट कसे भरायचा असा प्रश्न आता ज्वेलर्स दुकानदारांना सतावू लागला आहे.

हेही वाचा-कोरोनात दिलासा : बँक ऑफ महाराष्ट्राकडून तीन महिन्यात २ हजार ७८९ कोटींचे कर्जवाटप

सुधागड तालुक्यातील पाली शहरात राजू ओसवाल यांचे सोने चांदीचे नाकोडा ज्वेलर्स दुकान आहे. कोरोनामुळे मार्चपासून ज्वेलर्स दुकाने बंद आहेत. अखेर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी ओसवाल यांनी ज्वेलर्स दुकानात चक्क कांदे विकण्यास ठेवले आहेत. घरखर्च कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाल्याने कांदे विकण्यास सुरुवात केल्याचे राजू ओसवाल यांनी सांगितले. पुढे चार महिने पावसाळा असल्याने आर्थिक संकटात आहोत. त्यामुळे फळे विकण्याचा व्यवसाय सुरू करणार असल्याचे स्वप्नील परमार यांनी सांगितले.

दरम्यान, देशात २५ मार्चापासून टाळेबंदी असल्याने सरकारने केवळ जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याची दुकानदारांना परवानगी आहे.

Last Updated : May 25, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.