रायगड- जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लहान मुलांवर याचा कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही काल (सोमवार) साजरी करण्यात आलेल्या धुळवडीचा बच्चेकंपनीने मनोसक्त आनंद लुटलेला दिसून आले. सायंकाळी लहान मुलांनी विविध वेशभूषा करून ग्रामस्थांची मने जिंकली. सध्या कोरोना विषाणूमुळे लग्न समारंभात कमीत कमी उपस्थिती लावावी कारण सध्या कोरोनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. हे पटवून सांगण्यासाठी मुलांनी नवरा- नवरीचे पात्र साकरण्यात आले होते.
हेही वाचा- भाजपा उमेदवारानं प्रचारातून काढलं मोदींचं नाव; म्हणाला त्यांचं नाव घेतलं तर एकही मत मिळणार नाही
कोरोनाचे नियम पालन करण्यासाठी जनजागृती
गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दोन तीन महिन्यात यांचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत होते. त्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यामुळे कोरोनाने पुन्हा आपले पाय पसरण्यात सुरुवात केली. मात्र, या वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रत्येकांने सोशल डिस्टन्सचे पालन करा, सातत्याने हात धुवा, गर्दिच्या ठिकाणी जाणे टाळा असा संदेश नवरा नवरी चे वेशभूषा साकारलेल्या मुलांनी दिला.
लग्नातील अवाढव्य खर्च कमी करण्याचे आवाहन
विशेष म्हणजे लग्नाच्या वेळेस कमीकमीत वधु - वर पक्षांच्या लोकांनी उपस्थित राहून लग्न लावावे. शिवाय लग्न साध्या पद्धतीने करुन अनाठायी खर्च वाचविण्याचा प्रयत्न करा. आज प्रत्येकांची स्थिती उत्तम आहे, असे नाही यामुळे आपण लग्नाचा आनाठायी खर्चावर लगाम लावणे हाच या वेशभूषा काढण्याचा संदेश या मुलांनी दिला आहे.
हेही वाचा- 'ते ट्विट करून कोणाचे प्रवक्ते आहेत हे संजय राऊतांनी सिद्ध केले'