ETV Bharat / state

महाड शहरातील छबिना उत्सवाला प्रारंभ; भाविक पालखीत तल्लीन - जाकमाता

यातील सासणकाठी खांद्यावर नाचवण्याचा खेळ संपूर्ण कोकणात एकमेव महाड येथेच खेळला जातो. आज दिवसभर महाड शहरातील बाजारपेठेतून ही उंच सासणकाठ्यांची मिरवणूक पाहणे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले.

महाड शहरातील छबिना
author img

By

Published : Mar 4, 2019, 11:40 PM IST

Updated : Mar 5, 2019, 12:00 AM IST

रायगड - महाड शहरातील श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने विरेश्वर महाराजांची बहीण असलेली गावदेवी जाकमाता देवीच्या मंदिरात पालखीतून देवीची मिरवणूक काढण्यात आली.

महाड शहरातील छबिना

सकाळी विधीवत जाकमाता मंदिरात देवीची प्रार्थना करून छबिना उत्सव आनंदात पार पडावा, अशी प्रार्थना करत भाविकांनी व विरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पंचांनी पालखीची सुरुवात केली. पालखीपुढे पावा, झेंडाधारी मानकरी, वेषधारी गोंधळी, मानाचे खांदेकरी आणि पालखीपुढे महाड शहरातील प्रत्येक आळीतून निघालेले आखाडे, खालुबाजावर तल्लीन होऊन नाचणारे लेझीमधारी भाविक महाडकर आणि उंचच उंच सासणकाठी खांद्यावर नाचवणारे भाविक असा भरगच्च जथ्था या मिरवणूकीत सामील झाला आहे.

यातील सासणकाठी खांद्यावर नाचवण्याचा खेळ संपूर्ण कोकणात एकमेव महाड येथेच खेळला जातो. आज दिवसभर महाड शहरातील बाजारपेठेतून ही उंच सासणकाठ्यांची मिरवणूक पाहणे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले. ८ मार्चला महाड येथील विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव संपन्न होत आहे. या छबिन्याला रायगडसह परराज्यातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीपासून विरेश्वर महाराजांचा छबीना उत्सव साजरा होत असल्याने महाडकर सध्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.

Intro:महाड शहरातील छबिना उत्सवाला प्रारंभ

ससाणा काठी नाचवत भाविक पालखीत झाले तल्लीन

रायगड : महाड शहरातील प्रसिद्ध असलेले श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सवाला महाशिवरात्रीपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने
विरेश्वर महाराजांची बहीण असलेली गावदेवी जाकमाता देवीच्या मंदिरातून पालखीतून देवीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी विधीवत जाकमाता मंदिरात देवीची प्रार्थना करून छबिना उत्सव आनंदात पार पाड अशी प्रार्थना करीत भाविकांनी व विरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पंचांनी पालखीची सुरुवात केली. Body:पालखीपुढे पावा आणि झेंडाधारी मानकरी, वेषधारी गोंधळी, मानाचे खांदेकरी, आणि पालखीपुढे महाड शहरातील प्रत्येक आळीतून निघालेले आखाडे, खालुबाजावर तल्लीन होऊन नाचणारे लेझीमधारी भावीक महाडकर आणि उंचच उंच सासणकाठी खांद्यावर नाचवणारे भाविक असा भरगच्च जथ्था या मिरवणूकीत सामील झाला आहे.
Conclusion:यातील सासणकाठी खांद्यावर नाचवण्याचा खेळ संपूर्ण कोकणात एकमेव महाड येथेच खेळला जातो. आज दिवसभर महाड शहरातील बाजारपेठेतून ही उंचच सासणकाठ्यांची मिरवणूक पाहणे हे तर पर्यटकांचं आकर्षण ठरले आहे. 8 मार्च रोजी महाड येथील विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव संपन्न होत आहे. या छबिनाला रयगडसह परराज्यातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात.

महाशिवरात्रीपासून विरेश्वर महाराजांचा छबीना उत्सव साजरा होत असल्याने महाडकर सध्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.
Last Updated : Mar 5, 2019, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.