ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंवर खालच्या थराची टीका, नारायण राणेंविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल - रायगड जिल्हा न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Narayan Rane
Narayan Rane
author img

By

Published : Aug 24, 2021, 8:59 AM IST

Updated : Aug 24, 2021, 9:50 AM IST

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या जुहूतील निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

नारायण राणेंविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल

पुण्यातील पोलीस पथकही राणेंच्या अटकेसाठी चिपळूनला रवाना

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं चिपळूनला रवाना झाली आहेत. दोन पोलीस निरीक्षकांसह एकूण 15 कर्मचाऱ्यांच्या या पथकांमधे समावेश आहे. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस तातडीने चिपळूनला रवाना झाले आहेत. नाशिकमधेही राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीसही राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झालेत. जे पथक आधी पोहचेल ते पथक अटकेची कारवाई सुरु करणार असल्याचे समजते आहे.

'नारायण राणे गरिमा नसलेले भूत'

'नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची किव येते', अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राणेंविरोधात गुन्हा दाखल

भाजपची जनआशीर्वाद यात्रा काल (23 ऑगस्ट) दक्षिण रायगडमध्ये दाखल झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पाली येथून निघाली. महाड शहरात आल्यानंतर पीजी रेसिडन्सी रिसॉर्टमध्ये नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या थराची टीका करून नारायण राणेंनी गदारोळ माजवला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आज (24 ऑगस्ट) पहाटे नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तर, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथेही राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल

तसेच, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामूणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनआशीर्वाद यात्रेत गर्दी झाली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय म्हणाले राणे?

'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा काल (23 ऑगस्ट) रायगड जिल्ह्यात आली होती. त्या दरम्यान महाड येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाहा व्हिडिओ

आज महाडमध्ये नारायण राणेंचा निषेध

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल शिवसैनिकांमधून आता संताप व्यक्त होत आहे. महाड मधील शिवसैनिक आज (24 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून राणे यांचा निषेध करणार आहेत.

हेही वाचा - 'नारायण राणे "कोंबडी चोर"', शिवसैनिकांची टीका, वाचा सविस्तर...

Last Updated : Aug 24, 2021, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.