ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बसला अपघात, २ जण जखमी - Vivek More

बस चालक विवेक मोरे याचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ही बस बाजूच्या दुभाजकावर चढून समोर असलेल्या कंटेनरला धडकली.

अपघातग्रस्त बस
author img

By

Published : Jul 16, 2019, 8:45 PM IST

रायगड - मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खालापूर जवळील माधवबाग येथे एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एक वयोवृद्ध प्रवासी आणि बस चालक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघातग्रस्त बस

मुंबईतील कुर्ला येथून ही एसटी बस (एमएच १४/ बीटी २४१०) जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने भीमाशंकरकडे जात होती. या बसमध्ये ५९ प्रवासी होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बस खालापूर जवळील माधवबाग येथे आली असता बस चालक विवेक मोरे याचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ही बस बाजूच्या दुभाजकावर चढून समोर असलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बबन तळेकर हे वयोवृद्ध आणि चालक विवेक मोरे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर खालापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना आणि प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले होते. तर जखमींना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे हलवण्यात आले. अपघातग्रस्त एसटी बसला कंटेनरद्वारे बाजूला करण्यात आले.

Intro:मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एसटी बसला अपघात

दोन जण गंभीर जखमी

रायगड : मुंबई पुणे या जुन्या महामार्गावर खालापूर जवळील माधवबाग येथे एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकाला व कंटेनरला धडक देऊन अपघात झाला. या अपघातात बबन जिजाबा तळेकर (65) वयोवृद्ध प्रवासी व बस चालक विवेक मोरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे उपचारासाठी दाखल केले आहे. बस मध्ये अंदाजे 59 प्रवासी प्रवास करीत होते. होते. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.Body:मुंबई कुर्ला येथून भीमाशंकरकडे एसटी बस (एमएच 14/ बीटी 2410) ही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून पुणेच्या दिशेने अंदाजी 59 प्रवासी घेऊन निघाली होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बस खालापूर जवळील माधवबाग येथे आली असता बस चालक विवेक मोरे याचा बसवरील ताबा सुटून बस भरधाव वेगाने बाजूच्या दुभाजकावर चढून समोर असलेल्या कंटेनरला धडक दिली. Conclusion:या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बबन तळेकर हे वयोवृद्ध व चालक विवेक मोरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर खालापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना व प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले होते. तर जखमींना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त एसटी बसला कंटेनर द्वारे बाजूला करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.