रायगड - नेरळवरून माथेरानकडे जाताना घाटात एका कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये कार जळून खाक झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार चालकासह दोन प्रवाशांचा जीव वाचला आहे.
गरम होऊन कारने घेतला पेट -
मुंबईहून तीन जण माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनास जाण्यास निघाले होते. आटोमॅटिक आलिशान किया या कारने (एमएच ४६ बीवि १४३३) हे प्रवासी माथेरानला निघाले होते. माथेरान घाट चढत असताना अचानक कार गरम झाली. त्यामुळे चालकाने ही कार थांबवली. चालकाने बाहेर येऊन पाहणी केली असता अचानक कारला आग लागली. चालकाने कारमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांना तातडीने बाहेर काढले.
प्रवासी सुखरूप, कार जळून खाक -
प्रवासी उतरताच आगीने पेट घेऊन मदत येण्यापूर्वीच कार जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने दोन प्रवाशांचा जीव वाचला आहे. किया ही नवीन कार नुकतीच लॉन्च झाली असून ही पूर्णतः आटोमॅटिक कार आहे.
हेही वाचा - AUS vs IND : भारताचा पहिला डाव आटोपला, शतकवीर रहाणे धावबाद