ETV Bharat / state

Uran Blast : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट, एका इंजिनिअरचा मृत्यू, 2 कामगार जखमी

नवी मुंबई परिसरातील उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने झालेल्या स्फोटात एका जुनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईत हलविण्यात आले असता, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू ( Boiler pump explosion at Uran junior engineer killed and two workers injured ) झाला आहे.

author img

By

Published : Oct 9, 2022, 4:44 PM IST

Updated : Oct 9, 2022, 5:11 PM IST

Uran Blast
उरण येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने झालेल्या स्फोटात एका जुनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईत हलविण्यात आले असता, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू ( Boiler pump explosion at Uran junior engineer killed and two workers injured )झाला आहे.

नवी मुंबई परिसरातील उरण येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट

ज्युनिअर इंजिनिअर मृत्युमुखी - कंपनीत काम करीत असलेले जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी),विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फ़ोटात जबर भाजले होते. त्यांना उपचारासाठी इंदिरागांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता प्राथमिक उपचारानंतर त्याना पुढील उपचारासाठी दोघांना नवीमुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात तर एकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.उपचारादरम्यान जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे ( junior engineer vivek dhumal killed ) यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाबाबत अधिक तपास सुरु आहे.

अचानक वाढला दाब - रविवार असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नसली, तरी वायू विद्युत निर्मिती संच सुरु असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते.दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास कंपनीच्या बॉयलर विभागात काम सुरु असताना बॉयलर मधीलदाब अचानकपणे वाढला. यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी पंम्प सदरचा दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्फोट झाला. स्फोटचा आवाज जबरदस्त होता. सदरच्या बॉयलरचे दर 25 वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असते, तरी संबंधीत खात्याकडून तपासणी करून दाखला घेतला गेला नव्हता अशी माहिती उघड झाली आहे.

Last Updated : Oct 9, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.