ETV Bharat / state

ग्रामपंचायतींनी वीज बिले न भरल्याने गावात 'ब्लॅक आऊट', महावितरणकडून 1,090 कनेक्शन खंडीत - रायगडमध्ये ब्लॅक आऊट

वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नसल्याने कनेक्शन तोडली जात आहेत. आता जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून वीज कर घेत असतानाही रस्त्यावरील विजेचे बिल भरले नसल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडले आहे.

Blackout' in raigad village
Blackout' in raigad village
author img

By

Published : Mar 16, 2021, 4:47 PM IST

Updated : Mar 16, 2021, 4:55 PM IST

रायगड - वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नसल्याने कनेक्शन तोडली जात आहेत. आता जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून वीज कर घेत असतानाही रस्त्यावरील विजेचे बिल भरले नसल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक गावे ही अंधारात लोटली आहेत. 816 ग्रामपंचायतीत 2754 वीज कनेक्शन असून यापैकी 1090 कनेक्शन महावितरणने तात्पुरती तोडली आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून 149 कोटी रुपये महावितरणची वीज बिलपोटी थकबाकी शिल्लक आहे, अशी माहिती रायगडचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी दिली आहे.

ग्रामपंचायतीची 1,090 वीज कनेक्शन तोडली -

कोरोनामुळे महावितरणकडून नागरिकांना पाच महिन्यांची एकत्रित बिले देण्यात आली. त्यानंतर झालेल्या निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर त्वरित महावितरणने कामे करून गावतील, शहरातील वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. मात्र नागरिकांनी वीज बिले न भरल्याने महावितरणकडून घरचे वीज कनेक्शन तोडले जाऊ लागले. पण त्याचबरोबर जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायतींनी अद्याप रस्त्यावरील विजेची 149 कोटींची बिले थकवली आहेत. अखेर महावितरणकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील 1,090 कनेक्शन तोडली आहेत.

रायगडमधील गावात 'ब्लॅक आऊट'
हे ही वाचा -महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी आनंद महिंद्रांनी सांगितला उपाय
जिल्ह्यात ग्रामपंचायतीची 149 कोटी वीज बिले थकीत -
रायगड जिल्ह्यात 816 ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीकडून नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी सोबतच रस्त्यावर लावलेल्या विजेचा करही वसूल केला जातो. नागरिक हे प्रामाणिकपणे कर भरत असला तरी ग्रामपंचायतीकडून विजेची बिले भरली जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील 816 ग्रामपंचायतीकडून महावितरणचे 149 कोटींची वीज बिल थकीत राहिली आहेत. त्यामुळे महावितरणने 2,754 वीज कनेक्शनपैकी 1,090 कनेक्शन तात्पुरती तोडली आहेत. वीज बिल भरल्यानंतर ही कनेक्शन सुरू केली जाणार आहेत.
त्वरित वीज बिले भरण्याची नगरिकांची मागणी -
ग्रामपंचायतीने वीज बिले भरली नसल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. गावातील रस्त्यावरील वीज कनेक्शन महावितरणने तोडली असल्याने अनेक गावे ही अंधारात लोटली आहेत. त्यामुळे रस्त्यावर वीज नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास ग्रामस्थांना गावात वीज नसल्याने विजेविना चाचपडत रस्त्यावरून चालावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित वीज बिले भरून गावातील अंधार दूर करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

Last Updated : Mar 16, 2021, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.