ETV Bharat / state

राजकीय दबावामुळे पेण नगरपालिका गटनेत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल; भाजपच्या तीन आमदारांचा आरोप - आमदार महेश बालदी न्यूज

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, की राजकारण हे नेहमीच होतच असते. मात्र असा प्रकारे सुडाची भावना ठेवून हे राजकारण करीत असताल तर येत्या काळात जनता त्यांना धडा शिकवेल.

भाजपचे तीन आमदार
भाजपचे तीन आमदार
author img

By

Published : Oct 21, 2020, 7:43 PM IST

पेण (रायगड)- पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्याविरोधात सरकारी कामात अडळथला आणल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, ही तक्रार पालकमंत्री आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या राजकीय दबावाखाली येऊन केल्याचा आरोप पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

पेण नगरपालिकेच्या 16 ऑक्टोंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील नरदास चाळीतील अनधिकृत बांधकामाबाबत नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना याबाबत विचारणा केली. नगरपालिकेचे गटनेत्यांनी शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पेण पोलीस ठाण्यात दिवे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याबाबतआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार रविशेठ पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, की राजकारण हे नेहमीच होतच असते. मात्र असा प्रकारे सुडाची भावना ठेवून हे राजकारण करीत असताल तर येत्या काळात जनता त्यांना धडा शिकवेल. महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकेच्या सभागृहात असे प्रकार घडतात. मात्र ही घटना निंदनीय आहे. उलट मुख्याधिकारी यांनी प्रोसिंडिंग बदलायला लावली असल्याने त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी याकरीता आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करणार आहोत. त्यामुळे भाजपच्या गटनेत्यांना न्याय मिळण्याकरता भाजप रस्त्यावरची लढाई लढेल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ही एकमेव घटना आहे, की मुख्याधिकारी या राजकीय दबावाला बळी पडून राजकारण करीत आहेत. एकीकडे चक्रीवादळामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याकडे लक्ष न देता तटकरे सुडाची भावना ठेवत आहेत. मात्र, भाजप त्यांना लोकशाही मार्गाने दाखवून देईल असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. तर आमदार रविशेठ पाटील म्हणाले, की प्रशासनाची चुकीची भुमिका आहे. कोणतीही शहानिशा न करता दबावाखाली येऊन एवढ्या जलदगतीने तपास चक्र फिरवित आहेत. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा प्रितम पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, बंडू खंडागळे, दर्शन बाफना आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.