ETV Bharat / state

मृत दहशतवाद्यांचा आकडा सांगून भाजप जुमलेबाजी करतेय - प्रकाश आंबेडकर - बहुआ

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपच्या दाव्याची चिरफाड केल्याचे भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 11, 2019, 9:51 AM IST

पनवेल - भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मेले याचा आकडा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केला होता. यावरून भारिप नेते प्रकाश आंबेडकर पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यावर चांगलेच बरसले. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले याचा आकडा सांगून जुमलेबाजी करणारे भाजप सरकार आहे, असे वक्तव्य त्यांनी निशाणा साधला.

पनवेलमध्ये नुकतीच वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा पार पडली. हल्ल्यात किती दहशतवादी मेले हे अमित शहा यांना कोणी विचारले होते का? असा प्रश्न विचारत आंबेडकर यांनी प्रतिहल्ला चढवला. अमित शहा यांनी २५० अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपच्या दाव्याची चिरफाड केल्याचे भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. एवढे पाकिस्तानी झेंडे येतात कुठून, अगोदरच झेंडे प्रिंट केले होते का? हे सगळे आधीच ठरले होते का? असा खोचक सवाल देखील आंबेडकर यांनी विचारला.

Intro:पनवेल

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या 'जैश ए महंमद' च्या तळावर हल्ला करून हवाई दलाने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई नंतर आठवडाभरातच हल्ल्याला अपेक्षेप्रमाणे राजकीय वळण मिळाले. अतिरेक्यांच्या मृतांच्या संख्येवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह इतर विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. यावरून भारिप नेते प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चांगलेच बरसले. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेलेत याचा आकडा सांगून जुमलेबाजी करणारे भाजप सरकार आहे, असं वक्तव्य करून भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

Body:पनवेलमध्ये नुकतीच वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महा सभा पार पडली यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घणाघाती टीका केली. शिमग्याच्या सणास अजून दोन आठवडे बाकी असतानाच देशात राजकीय धुळवड सुरू झाली आहे. खरतर लोकसभा निवडणुका जेमतेम काही महिन्यांवर आल्यामुळे अशी धुळवड अपेक्षित असली तरी ही आत्ताची धुळवड हि देशाच्या संरक्षणासारख्या या महत्त्वाच्या विषयावरून सुरू होणं मात्र कोणालाच रुचणार नाही. भाजप या हल्ल्याचे राजकारण करून आपली राष्ट्रभक्तांची मतपेढी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करते तर विरोधकांनाही त्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उभे करतात, भाजपला खोट पाडायच आहे. पण आता भाजप आणि विरोधक दोघांचाही समाचार घेत हल्ल्यात किती दहशतवादी मेले हे अमित शहा यांना कोणी विचारलं होतं का ? असं सांगून भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिहल्ला चढवला.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताने पाकिस्तानातील बालाकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मद चे 250 अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला. भाजपच्या वतीने या कारवाईत मृतांच्या संख्येत बद्दल वक्तव्य करणारे अमित शहा हे पहिलेच नेते आहेत ही सुद्धा विशेष बाब आहे. काही माध्यमांनी या कारवाईत 300 अतिरेकी मारले गेल्याच्या बातम्या दिल्या होत्या. या ही पुढे आंतरराष्ट्रीय मीडियाने मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपच्या दाव्याची चिरफाड केल्याचं भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्हाला पाकिस्तानवर हल्ला हल्ला करायला बारा दिवस लागले, पाकिस्तानने चार तासात वार केले. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवालही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

हल्ल्यानंतर ठीकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे देखील जाळण्यात आले. एवढे पाकिस्तानी झेंडे येतात कुठून? अगोदरच झेंडे प्रिंट केले होते का ? आणि हा हल्ला करायचं आधीच ठरलं होतं का ? असा खोचक सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

Conclusion:भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. एकीकडे राफेल विमान करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात असताना आता भारतीय हवाई दलाने केलेल्या धडक कारवाईवरून देशात राजकीय रण पेटले आहे.
---------

स्टोरी साठी पॅकेज सोबत जोडत आहे. कृपया इनाडू च्या वेबसाइटवर आणि ऍप वर पब्लिश करावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.