रायगड : करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजयसिंह सेंगर यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय सेंगर यांना पनवेल येथील अग्निशमन केंद्राजवळ जबरदस्त मारहाण करण्यात आली. अजयसिंग सेंगर यांनी संविधानाबद्दल अक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचा आरोप भीम अनुयायांनी करत त्यांना मारहाण केली आहे. या घटनेने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भीम शक्ती संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी सेंगर यांना पनवेल शहरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ वेठीस धरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भीमसैनिकांचे अभिनंदन केले आहे.
आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या : अजयसिंग सेंगर यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना भीम शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. परंतु भीम शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्यांनी सेंगर यांच्यावर शिवीगाळ केली, त्यांना पुन्हा पकडले. कार्यकर्त्यांनी असा दावा केला की, किमान दोन वेळा सेंगर यांनी दलित प्रतीक डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या. त्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही केली होती, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही.
-
भीम टोला✊
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
करणी सेनेंचा अजय सेंगर मागे याने #भीमाकोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी दिली होती आज #भीमसैनिकांनी याला चांगलाच चोप दिलेला आहे..
आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अभिनंदन जय भीम
ह्या भीमकोरेगाव प्रकरणात सेंगर ला आव्हान मी दिले होते… जवळ पास येऊन दाखव pic.twitter.com/ovtErnMTEg
">भीम टोला✊
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2023
करणी सेनेंचा अजय सेंगर मागे याने #भीमाकोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी दिली होती आज #भीमसैनिकांनी याला चांगलाच चोप दिलेला आहे..
आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अभिनंदन जय भीम
ह्या भीमकोरेगाव प्रकरणात सेंगर ला आव्हान मी दिले होते… जवळ पास येऊन दाखव pic.twitter.com/ovtErnMTEgभीम टोला✊
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2023
करणी सेनेंचा अजय सेंगर मागे याने #भीमाकोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी दिली होती आज #भीमसैनिकांनी याला चांगलाच चोप दिलेला आहे..
आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अभिनंदन जय भीम
ह्या भीमकोरेगाव प्रकरणात सेंगर ला आव्हान मी दिले होते… जवळ पास येऊन दाखव pic.twitter.com/ovtErnMTEg
वादग्रस्त भेटीवर जोरदार टीका : नंतर पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या सेंगरने दावा केला की, वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेब यांच्या समाधीला दिलेल्या वादग्रस्त भेटीवर जोरदार टीका केल्याबद्दल त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सेंगर यांनी या हल्ल्याचा निषेध करतानाच भीम शक्ती संघटनेने असा इशारा दिला आहे की, त्यांनी डॉ. आंबेडकर किंवा संविधानाविरोधात अशी टीका करत राहिल्यास आणखी परिणाम भोगावे लागतील. माध्यमांनी वारंवार प्रयत्न करूनही, भीम शक्ती संघटना आणि करणी सेनेचे नेते या घटनेवर त्यांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हते. हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा :