रायगड - अन्वय नाईक आणि कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब गोस्वामी यांना सर्वसामान्य कैद्याला जशी वागणूक दिली जाते, तशी वागणूक देण्यात आली. त्यांनी तीन रात्र ही डासांसोबत आणि कैद्यांना दिले जाणारे साधे जेवण करून काढली. अर्णब गेल्या तीन दिवसांपासून बिस्किटे आणि एकाच कपड्यांच्या जोडीवर राहत आहे. त्यामुळे तीन रात्र अर्णव, नितेश, फारुखसाठी कठीणच ठरली आहे.
रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांनी लाखो रुपये थकविल्याने 4 मे 2018 रोजी इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. अनव्य नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तिघांची नावांचा उल्लेख करून सुसाईड नोट लिहिली होती. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बिस्किटे खाऊन काढल्या तीन रात्री
4 नोव्हेबर रोजी अर्णब यांना रायगड पोलिसांनी अटक केली. त्याला अलिबाग न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने गोस्वामी, सारडा आणि शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अर्णब आणि दोघांना अलिबाग शहरातील एका मराठी शाळेत ठेवण्यात आले. ही शाळा कैद्यांसाठी कोविड सेंटर म्हणून बनविण्यात आली आहे. गोस्वामी, सारडा आणि शेख या शाळेत डासांच्या सोबतीने तीन रात्र काढल्या आहेत. तीनही कैद्यांना मिळणारे साधे शाकाहारी जेवण रात्री देण्यात आले. अर्णब यांनी मात्र बिस्किटे खाऊन तीन रात्र काढल्या आहेत. मुंबई येथे आलिशान घरांमध्ये राहणाऱ्या या तिघांनाही शाळेच्या एका रूममध्ये रात्र काढावी लागली आहे. साध्या सतरंजीवर त्यांना झोपावे लागत आहे.
आजच्या सुनवणीवर तिघांचे भवितव्य
एफआयआर रद्द करणे तसेच जामीन अर्जावर उच्च न्यायालयात तर अलिबाग न्यायालयात पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी आहे. या सुनावणीत न्यायालयाकडून अर्णब, नितेश, फारुख यांना दिलासा मिळणार का, त्यावर तिघांचे भवितव्य ठरणार आहे.
हेही वाचा- अर्णब गोस्वामी यांना दिलासा मिळणार का? पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू