ETV Bharat / state

रायगडच्या रोहा गटविकास अधिकाऱ्याला लाच घेताना अटक; लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

author img

By

Published : Mar 26, 2022, 11:29 AM IST

पंडीत राठोड हे रोहा येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तळा पंचायत समितीचा अतिरिक्त गटविकास अधिकारीपदाचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. रोहा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी पंडीत राठोड
गटविकास अधिकारी पंडीत राठोड

रायगड - जिल्ह्यातील रोहा येथील गटविकास अधिकारी पंडीत राठोड यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पंडीत राठोत असे आहे. तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्याकरिता १० हजार रुपयांची लाच घेताना रोहा गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यापूर्वी फेब्रुवारीत या अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांची लाच घेतली होती.

रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - पंडीत राठोड हे रोहा येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तळा पंचायत समितीचा अतिरिक्त गटविकास अधिकारीपदाचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. रोहा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा रचला सापळा - तक्रारदारविरोधात नवी मुंबईतील कोकण भवनमध्ये विभागीय चौकशी सुरू आहे. पंडीत राठोड यांना विभागीय चौकशीतील सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. या विभागीय चौकशीमध्ये राठोड यांनी तक्रारदाराच्या बाजूने अहवाल पाठविण्याकरिता १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच स्वरूपात त्यांनी २८ फेब्रुवारी 2022 रोजी स्वीकारला. उर्वरित १० हजार रुपयांची मागणी केली म्हणून तक्रारदाराने राठोड यांच्या विरोधात एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २५ मार्च रोजी पचांसमक्ष पडताळणी करुन १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राठोड यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.