रायगड - पाणी हे जीवन आहे. हेच जीवन स्वातंत्र्य पूर्व काळात रायगड जिल्ह्यातील महाडमधील दलित बांधवांसाठी मात्र शाप ठरले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी सर्वांसाठी खुले व्हावे आणि दलितांनाही पाणी पिण्यास मिळावे यासाठी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.
पाणवठे खुले करुनही दलित राहिले होते तहानलेले -
मुंबई प्रांताचे तत्कालीन अध्यक्ष रावसाहेब बोले यांनी 1920 साली दलितांनाही सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार त्यावेळेचे महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मात्र 1927 सालापर्यंत याची अंमलबजावणी झालीच नव्हती. त्यामुळे महाड मधील दलित बांधव यांना पाण्यासाठी झगडावे लागत होते.
आंबेडकर जयंती विशेष : महाडचा चवदार तळे सत्याग्रह समानतेचे प्रतीक - महाडचा चवदार तळे सत्याग्रह समानतेचे प्रतीक
पाणी हे जीवन आहे. हेच जीवन स्वातंत्र्य पूर्व काळात रायगड जिल्ह्यातील महाडमधील दलित बांधवांसाठी मात्र शाप ठरले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी सर्वांसाठी खुले व्हावे आणि दलितांनाही पाणी पिण्यास मिळावे यासाठी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला.
![आंबेडकर जयंती विशेष : महाडचा चवदार तळे सत्याग्रह समानतेचे प्रतीक महाडचा चवदार तळे सत्याग्रह समानतेचे प्रतीक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11387473-thumbnail-3x2-mahad.jpg?imwidth=3840)