ETV Bharat / state

नागोठण्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; तर रोह्यात कोसळली दरड

रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस होत असून नागोठण्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीचे पाणी पुलावर आल्याने वाहतूक विस्कळी झाली आहे. तर रोहा तालुक्यात तांबडी केळघर रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून रोहाकडे येणारा व जाणारा रस्ता बंद झाला आहे. यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला आहे.

नागोठणे येथे अंबा नदीचे पाणी बाजार शिरत आहे.
author img

By

Published : Jul 2, 2019, 10:15 AM IST

Updated : Jul 2, 2019, 10:55 AM IST

रायगड - जिल्ह्यात रात्री पासून काही भागात पावसाने उसंत घेतली असली तरी नागोठणे, रोहा, सुधागड पाली, महाड, श्रीवर्धन या दक्षिण भागात पाऊस रात्रभर पडत होता. नागोठणेमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी बाजरात घुसले आहे. तर पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नागोठणे येथे अंबा नदीचे पाणी बाजार शिरत आहे.

जिल्ह्यात चार दिवसापांसून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब वाहण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा काळ या नद्या वाहत असून अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी संथ गतीने बाजारात घुसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागोठणेकरांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्क राहण्यास सांगितले आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसले असल्याने नागरिक दुसरीकडे आश्रयाला गेले आहेत.

रोहा तालुक्यात दरड कोसळ्याने तुटला संपर्क

रोहा तालुक्यात तांबडी केळघर रस्त्यावर कवळटे गावाजवळ रस्त्यावर दरड कोसळली आहे. रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल असून रस्ता मोकळा करण्याची उपाययोजना करीत आहेत. तर २ तासांत रस्ता मोकळा होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, रोहाकडे येणारा व जाणारा मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

Intro:नागोठणे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

नदीचे पाणी बाजारात घुसण्यास सुरुवात

रोहा तालुक्यात दरड कोसळली

रायगड : जिल्ह्यात रात्री पासून काही भागात पावसाने उसंत घेतली असली तरी नागोठणे, रोहा, सुधागड पाली, महाड, श्रीवर्धन या दक्षिण भागात पाऊस रात्रभर पडत होता. नागोठणेमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी बाजरात घुसले आहे. तर पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. Body:जिल्ह्यात चार दिवसापासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब वाहण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा काळ या नद्या वाहत असून अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

रात्रीपासून नागोठणे भागात जोरदार पाऊस पडत असल्याने अंबा नदीची धोक्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाणी संथ गतीने बाजारात घुसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागोठणेकरांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्क राहण्यास सांगितले असून या अनेकांच्या घरात पाणी घुसले असल्याने नागरिक दुरीकडे आश्रयाला गेले आहेत. तर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Conclusion:रोहा तालुक्यात तांबडी केळघर रस्त्यावर कवळटे गावाजवळ रस्त्यावर दरड कोसळली असुन रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल असून रस्ता मोकळा करण्याची उपाययोजना करीत आहेत. तर दोन तासात रस्ता मोकळा होईल असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र रोहा कडे येणारा व जाणारा मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
Last Updated : Jul 2, 2019, 10:55 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.