ETV Bharat / state

रायगडमधील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे प्रशासनाचे आदेश

जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत हद्दीत 535 इमारती धोकादायक आहेत. त्यात 36 इमारती अतिधोकादायक असून 34 खासगी व दोन शासकिय इमारतींचा त्यामध्ये समावेश आहे. 499 धोकादायक असून त्यात 8 शासकिय व 491 खासगी इमारतींचा समावेश आहे.

wall
भिंतीला गेलेला तडा
author img

By

Published : Aug 28, 2020, 5:30 PM IST

रायगड - महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पडून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घ्या, असे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, उरण, माथेरान, खोपोली, पेण, रोहा, मुरूड, श्रीवर्ध व महाड या नगरपरिषदा आहेत. खलापूर, म्हसळा, माणगाव, तळा, पोलादपूर या नंगरपंचायती आहेत. जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत हद्दीत 535 इमारती धोकादायक आहेत. त्यात 36 इमारती अतिधोकादायक असून 34 खासगी व दोन शासकिय इमारतींचा त्यामध्ये समावेश आहे. 499 धोकादायक असून त्यात 8 शासकिय व 491 खासगी इमारतींचा समावेश आहे.

या इमारती धोकादायक असतानाही नगरपंचायत व नगरपालिकांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पावसाळ्यात या इमारतीमधील नागरिकांना नोटीसा बजावण्याचे काम केले जाते. प्रत्यक्षात मात्र या धोकादायक इमारतीमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरत आहे. या इमारती रिकाम्या केल्या जात नाहित.

महाड येथील तारिक गार्डन ही इमारत कोसळली. त्यात 16 जाणांना प्राण गमवावे लागले. नऊ जण जखमी झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. महराष्ट्र क्षेत्र व नगरविकास कायदा 1966 च्या 195 कलमानुसार धाकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधाकादाय इमारती रिकाम्या कराव्यात असे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व नगरपरिषदा व नंगरपंचातींच्या मुख्याधीकार्‍यांना दिले आहेत.

धोकादायक इमारतींचे सर्वेंक्षण करून त्यातील अतिधाकादायक इमातरती रिकाम्या करून घ्याव्यात असे आदेश जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नंगरपंचातींच्या मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.