ETV Bharat / state

एटीएममधून पैसे चोरणारी 5 जणांची टोळी जेरबंद, पोयनाड पोलिसांची कारावाई - poynad atm money stealing

पोयनाड पोलीस ठाणे येथील आर.डी.सी.सी बँक मधील एटीएममधून पैसे चोरी झाले होते. या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोयनाड पोलिसांन यश आले आहे.

5 people arrested for stealing money from ATM

author img

By

Published : Jul 6, 2022, 11:38 AM IST

पेण (रायगड) - पोयनाड पोलीस ठाणे येथील आर.डी.सी.सी बँक मधील एटीएममधून पैसे चोरीच्या गुन्ह्याची उकल करून पाच जणांना पोयनाड पोलिसांनी शिताफिने जेरबंद केले आहे. सोनू कुमार सरजु प्रसाद गौतम (वय-24) यास फिर्यादी आर.डी.सी.सी. बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बाळाराम पाटील यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले होते. गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी सोनुकुमार सरजुप्रसाद गौतम याची चौकशी केली असता त्याने वसई येथील साथीदार रणजितकुमार गोविंद प्रसाद (वय-19 रा. उ. प्रदेश सध्या रा.पालघर) याचे नाव घेतले. प्रसादला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता इतर तीन आरोपी पोलिसांना गवसले.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Raigad: जिलह्यातील शिवसेनेचे आमदार बंडखोर नसून शिवसैनिकचं -मानसी दळवी

पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी टीम तयार करून रणजीतकुमार गोविंद प्रसाद याला पालघर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने वडखळ, पेण येथील जमील छेदी शेख (वय 18) जितेंद्र विनोद सिंग (वय 23) विशाल राजेंद्र यादव (वय 28) हे आणखी तीन साथीदार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना देखील वडखळ तसेच पेण येथून ताब्यात घेवून अटक केली आहे.

चोरी करताना एक जण एटीएममध्ये पैसे चोरी करण्याकरीता प्रवेश करतो. तर इतर चौघे बाहेर टेहेळणी करत थांबत असत. आत ए.टी.एम.मध्ये प्रवेश करणारा आरोपी स्क्रूड्रायव्हरने ए.टी.एम. मशीनचे पैसे बाहेर येण्याचे शटर उचकटून-उपकून आपल्याकडील मशीन एटीएम मशीनमध्ये घुसवीत असत. त्याच्या सहायाने बाहेर आलेली रक्कम शटरमध्ये घुसवलेल्या मशीनच्या सहायाने बाहेर खेचून पैसे लंपास करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील सर्व आरोपी हे आळीपाळीने अशा चोर्‍या करत असल्याचे, तसेच वयस्कर गोरगरीब ज्यांना ए.टी.एम वापरण्याचे माहीत नाही अशा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत होते. त्यांना विश्‍वासात घेवून त्यांच्याकडील एटीएमचा पासवर्ड माहिती करून चलाखीने त्यांचा ए.टी.एम. बदलून त्यांच्या कार्डमधून पैशाची चोरी करीत असल्याचेही सखोल तपासात निष्पन्न झाले आहे. या आरोपींकडून स्क्रुड्रायव्हर, पैसे काढण्यासाठी बनवलेली लोखंडी पत्र्याची मशीन, तसेच वेगवेगळ्या बँकेचे एकूण 32 डेबीट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार दुष्यंत जाधव हे करीत आहेत. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एम.टी.जाधव, सहाय्यक फौजदार दुष्यंत जाधव, सहा. फौजदार रामचंद्र ठाकूर, पोलीस नाईक अक्षय पाटील, पोलीस शिपाई किशोर चव्हाण यांचा सहभाग होता.

हेही वाचा - Bus service closed : पेण तालुक्यातील दादर-भाल-कणे एसटी सेवा बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.