ETV Bharat / state

रायगड : खोपोलीत बहीण-भाऊ बेपत्ता; नाल्यात वाहून गेल्याची शक्यता - Babu Hachanlikar missing Krantinagar

खोपोली येथील क्रांतीनगर भागात राहणारे बहीण-भाऊ बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हे बहीण-भाऊ शास्त्रीनगर - विणानगर भागातून वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांडून सांगण्यात येत आहे.

Babu Hachanlikar missing Krantinagar
बाबू हचंलीकर बेपत्ता क्रांतीनगर
author img

By

Published : Jul 19, 2021, 10:39 PM IST

रायगड - खोपोली येथील क्रांतीनगर भागात राहणारे बहीण-भाऊ बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हे बहीण-भाऊ शास्त्रीनगर - विणानगर भागातून वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांडून सांगण्यात येत आहे.

शास्त्रीनगर - विणानगर भागातून वाहणारा नाला

हेही वाचा - खापोलीचे भाजपा नेते मंगेश काळोखे यांचा 500 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

निलम श्रीकांत हचंलीकर (वय 7), बाबू श्रीकांत हचंलीकर (वय 5) असे बेपत्ता बहीण-भावाचे नाव आहे. शास्त्रीनगर - विणानगर भागातून वाहत असलेला नाला दोन दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहे. नाल्याला लागून असलेल्या क्रांतीनगर भागातील बहीण भाऊ पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडले असता ते उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते हे दोघे जण नाल्याच्या पाणी प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर क्रांतीनगरमधील नागरिक, खोपोली पोलीस, नगरपालिका, अग्निशमन दलाचे जवान, खोपोली पालिका आपत्कालीन व्यवस्था, खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय टीमचे सदस्य बेपत्ता बहीण-भावाच्या शोध कार्यात लागले आहेत. मुसळधार पाऊस, त्यातच पाताळगंगा नदीला आलेला मोठा पूर यामुळे शोध कार्य कठीण बनले आहे.

हेही वाचा - लोणावळा - खंडाळा पर्यटकांनी हाऊसफुल्ल; सोशल डिस्टन्सचा फज्जा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.