ETV Bharat / state

रायगड पोलिसांच्या मदतीला 340 होमगार्डची फौज; पोलिसांवरील ताण झाला कमी - रायगड पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड लेटेस्ट बातमी

रायगड पोलीस दलात 2500 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण पडत असतो. त्यामुळे पोलीस दलाने होमगार्डची मदत घेण्याचे ठरविले. त्यानुसार होमगार्ड कार्यालयाशी संपर्क करून 340 होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या मदतीला मागविले. 40 होमगार्ड हे वाहतूक शाखेकडे आणि 300 होमगार्ड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यासोबत तैनात केले आहेत.

340 homeguard will join raigad district police
रायगड पोलिसांच्या मदतीला 340 होमगार्डची फोज
author img

By

Published : Dec 7, 2019, 3:16 PM IST

रायगड - जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला 340 होमगार्ड कर्मचारी रुजू झाले आहेत. यामुळे पोलिसांच्या कामावर होणारा ताण कमी झाला आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आणि वाहतूक पोलिसांच्या दिमतीला या होमगार्ड कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 290 पुरुष आणि 50 महिला होमगार्ड कर्मचारी हे मदतीसाठी आलेले आहेत.

रायगड पोलिसांच्या मदतीला 340 होमगार्डची फौज

हा जिल्हा पर्यटनक्षेत्र जिल्हा आहे. याठिकाणी लाखो पर्यटक येत असतात. डिसेंबरअखेरीस समुद्र किनाऱ्यावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल होत असतात. तसेच जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे, बंदोबस्त याचा ताण जिल्हा पोलीस दलावर नेहमी पडत असतो. तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने वाहतुकीचा प्रश्न ही मोठी समस्या जिल्ह्यातील महामार्ग आणि शहरात पाहावयास मिळतात.

हेही वाचा - पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद

रायगड पोलीस दलात 2500 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण पडत असतो. त्यामुळे पोलीस दलाने होमगार्डची मदत घेण्याचे ठरविले. त्यानुसार होमगार्ड कार्यालयाशी संपर्क करून 340 होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या मदतीला मागविले. 40 होमगार्ड हे वाहतूक शाखेकडे आणि 300 होमगार्ड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यासोबत तैनात केले आहेत.

हेही वाचा - बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय

होमगार्ड कर्मचारी यांची मदत वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच बंदोबस्तासाठी घेण्यात आलेली आहे. होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या मदतीला आल्याने पोलिसांच्या कामावरचा ताण हा कमी झाला आहे. होमगार्ड कर्मचाऱ्यांनाही यामुळे एकमार्गी काम करण्याची संधी मिळाली आहे. तर पोलिसांनी त्यांची मदत कायमस्वरूपी घेतल्यास त्याच्याही नोकरीचा प्रश्न सुटू शकतो.

Intro:रायगड पोलिसांच्या मदतीला 340 होमगार्डची फोज

300 पोलिसांच्या तर 40 वाहतूक पोलिसांच्या मदतीला होणगार्ड

पोलिसांच्या कामावरील ताण झाला कमी

रायगड : रायगड जिल्हा पोलिस दलाच्या मदतीला 340 होमगार्ड कर्मचारी रुजू झाले असून पोलिसांच्या कामावर होणारा ताण कमी झाला आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आणि वाहतूक पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 290 पुरुष आणि 50 महिला होमगार्ड कर्मचारी हे मदतीसाठी आलेले आहेत.

Body:रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून लाखो पर्यटक हे जिल्ह्यात येत असतात. वर्षाच्या शेवटचा महिना डिसेंबरमध्ये समुद्र किनाऱ्यावर नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल होत असतात. तसेच जिल्ह्यात आंदोलन, मोर्चे, बंदोबस्त याचा ताण हा जिल्हा पोलीस दलावर नेहमी पडत असतो. तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने वाहतुकीचा प्रश्न ही मोठी समस्या जिल्ह्यातील महामार्ग आणि शहरात पहावयास मिळतात.

रायगड पोलीस दलात अडीच हजार पोलीस कर्मचारी कार्यरत असून जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण पडत असतो. त्यामुळे पोलीस दलाने होमगार्डची मदत घेण्याचे ठरविले. त्यानुसार होमगार्ड कार्यालयाशी संपर्क करून 340 होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या मदतीला मागविले. 40 होमगार्ड हे वाहतूक शाखेकडे आणि 300 होमगार्ड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यासोबत तैनात केले आहेत.

Conclusion:होमगार्ड कर्मचारी यांची मदत वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच बंदोबस्तासाठी घेण्यात आलेली आहे. होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या मदतीला आल्याने पोलिसांच्या कामावरचा ताण हा कमी झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या इतर कामासाठी पोलीस कर्मचारी तैनात करता आलेले आहेत. होमगार्ड कर्मचाऱ्यांनाही यामुळे एकमार्गी काम करण्याची संधी मिळाली असून त्याची मदत पोलिसांनी कायमस्वरूपी घेतल्यास त्याच्याही नोकरीचा प्रश्न सुटू शकतो. याबाबत शासनाने विचार करणे गरजेचे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.