ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील 277 मच्छीमार बोटी अजून समुद्रात - रायगडजिल्ह्यातील मच्छीमार बोटींबद्दल बातमी

रायगड जिल्ह्यातील 524 मच्छीमार बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. यातील 277 मच्छीमार बोटी अजून समुद्रात आहेत.

277 fishing boats from Raigad district still at sea
जिल्ह्यातील 277 मच्छीमार बोटी अजून समुद्रात
author img

By

Published : May 13, 2021, 5:24 PM IST

रायगड : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमाराना खोल समुद्रात मच्छीमारी करण्यास जाण्यास बंदी जिल्हा प्रशासनाने घातली आहे. असे असतानाही रायगड जिल्ह्यातील 524 मच्छीमार बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. यातील 382 बोटी पुन्हा किनाऱ्याला आल्या आहेत. दुपारनंतर अलिबागमधील अजून 135 मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असल्याने 277 मच्छीमार बोटी अजूनही समुद्रात आहेत. मत्स्य विभागाकडून चेअरमन मार्फत त्यांना संपर्क करून परत किनाऱ्यावर बोलविण्याचे आदेश दिले आहेत.

524 पैकी 382 बोटी आल्या किनाऱ्याला -

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने 14 ते 16 मे दरम्यान वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील मच्छीमाराना खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, या बंदीचे उल्लंघन करून अलिबाग 411, मुरुड 21, उरण 92 अशा 524 मच्छीमार बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. यापैकी अलिबाग 324, मुरुड 8 तर उरण तालुक्यातील 10 अशा 382 बोटी पुन्हा परत फिरून किनाऱ्याला लागल्या आहेत.

277 बोटी अजून समुद्रात -

अलिबाग तालुक्यातील 47, मुरुड 13 तर उरणमधील 82 अशा एकूण 142 बोटी अद्यापही समुद्रात आहेत. पुन्हा दुपारनंतर अलिबागमधील 135 बोटी मच्छीमारीसाठी गेल्या असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील 277 मच्छीमार बोटी अजून समुद्रात आहेत. समुद्रात गेलेल्या जिल्ह्यातील 277 बोटीवर संस्थेच्या चेअरमन यांना संपर्क करण्यास सांगून पुन्हा परत बोलविण्यास सागितले असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य आयुक्त सुरेश भारती यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.