रायगड - माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिक क्षेत्रातील क्रीपझो प्रा. लि. कंपनीत आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये 18 जण जखमी झाले आहेत. यातील ५ कर्मचारी हे गंभीर भाजल्याने त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर, इतर कर्मचाऱ्यांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कंपनी आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम तयार करते.
क्रीपझो कंपनी ही आग विझविण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम बनवणारी कंपनी आहे. ही सिस्टम गॅसच्या साहाय्याने तयार केली जाते. शुक्रवारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये डेमो अधिकारी आणि कर्मचारी काम करीत असताना सिलेंडरला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि डेमो केलेल्या खोलीच्या बाहेर आली. त्याचवेळी डेमो रूमच्या बाहेर उभे असलेले 18 कामगार आगीच्या संपर्कात येऊन भाजले गेले.
हेही वाचा - 'साहेब..लेकरासारख्या बागा वाढवल्या अन् होत्याचं नव्हतं झालं'
या आगीत 18 कामगार जखमी झाले असून 5 कामगार गंभीररित्या भाजले आहे. गंभीररित्या भाजलेल्या पाचही जखमींना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविले आहे. तर, इतर जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे -
आशिष, सुनील रेगोटे (36), शुभम जाधव (23), सूरज उमटे (23), किशोर कारगे (30), चेतन कारगे (28), राकेश हळदे (30), कैलास पडावे (32), रूपेश मानकर (25), सुरेश मांडे (24), प्रसाद नेमाणे (23), वैभव पवार (26), राजेश जाधव (28), आकाश रक्ते (20), मयुर तामणकर (24), रजत जाधव (23), प्रमोद म्हस्के (23), सुनील पाटील हे जखमी झाले आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! कॉलेजला जाण्यासाठी बाईक देत नाही म्हणून विद्यार्थ्याने घेतले जाळून