ETV Bharat / state

ब्रेक फेल झालेले वाहन उलटत दोन दुचाक्यांना ठोकरले, 15 जखमी

वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ते वाहन पलटून दोन दुचाक्यांनाही ठोकर दिली. यात पंधरा जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने
author img

By

Published : Nov 6, 2019, 8:37 PM IST

रायगड - कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन करून परतत असणाऱ्या कल्याण परिसरातील महिला भक्तांच्या वाहनाचा खोपोलीच्या बोरघाटात आज अपघात झाला. वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ते वाहन उलथत दोन दुचाक्यांनाही ठोकर दिली. या अपघातात टेम्पोमधील अकरा महिला, दोन लहान मुले व दोन दुचाकीस्वार, असे पंधरा जण जखमी झाले आहेत.
या मार्गाने वाहन उतरविण्यास मनाई असताना काही चालक या बाजूने वाहन उतरवतात व उताराचा अंदाज न आल्याने अपघात होतात. दोनच दिवसांपूर्वी या बोरघाटात प्रवासी बसचा अपघात झाला होता व त्यात 5 जणांचा जीव गेला होता.

या अपघातात कल्याण, शहाड परिसरातील काही महिला कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनास आल्या होत्या. त्या एका टेम्पोत मागे आपल्या मुलांसह बसल्या होत्या. त्यांचा टेम्पोचा खंडाळा ते खोपोली असा जूना बोरघाट मार्गे घाट उतरताना ब्रेक फेल झाला. यामुळे चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले तेव्हा एका तीव्र उताराच्या वळणावर हा टेम्पो वेगात उलटला व 50 फुट फरफटत गेला. त्याच वेळी टेम्पोने पुण्याकडे जाणाऱ्या दोन दुचाक्यांना धडक दिली. अपघातात टेम्पोतील सर्वच महिला जखमी झाल्या सर्वांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तर दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रसतांच्या मदतीला काहींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

या मार्गावरुन घाट उतरण्यास मनाई असतानाही काही चालक येथून गाड्या खोपोलीत उतरवतात व रस्त्याच्या उताराचा अंदाज न आल्याने अनेक अपघात येथे होत आहेत. येथील अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Intro:कार्ला हुन एकविरे च्या दर्शनाहुन परतताना बोरघाट उतरतांना टेम्पो चे ब्रेक निकामी झाल्याने पलटी
दोन बाइक्स ला दिली ठोकर जवळपास 15 जन जखमी
रायगड - कार्ला येथील एकवीरा मातेचे दर्शन करून परतत असणाऱ्या कल्याण च्या परिसरातील महिला भक्तांच्या टेम्पो ला खोपोली च्या बोरघाटात आज अपघात झाला असून टेम्पो चे ब्रेक निकामी झाल्याने तो पलटी होऊन त्याने दोन बाइक्स ला ही ठोकर दिली या अपघातात टेम्पो मधील दहा महिलांसह दोन लहान मुले व बाईक स्वार असे जवळपास पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत , खर तर या मार्गाने वाहन उत्तरण्यास मनाई असताना काही चालक या बाजूने वाहन उतरवतात व उताराचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत दोनच दिवसांपूर्वी या बोरघाटात प्रवासी बस च्या अपघात झाला होता व त्यात पांच जनांचा जीव गेला होताBody:सदर अपघातात कल्याण, शहाड परिसरातील काही महिला कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनास आल्या होत्या त्या एका टेम्पोत मागे आपल्या मुलांसह बसल्या होत्या त्यांचा टेम्पो खंडाला ते खोपोली असा जूना बोरघाट मार्ग उतरते वेळी टेम्पो चे ब्रेक फेल झाला व चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले तेव्हा एका तीव्र उताराच्या वळणावर हा टेम्पो वेगात पलटी झाला व 50 फुट फरफटत गेला त्याच वेळेस टेम्पो ने पुण्या कड़े जात असलेल्या दोन मोटारसायकल ला धड़क दिली,अपघातात टेम्पो तिल जवळपास सर्वच महिला जखमी झाल्या त्यांच्या सर्वांच्या डोक्याला जबर मार लागला आहे तर मोटारसायकल चे दोन्ही चालक गभीर जखमी झाले आहेतConclusion:अपघाताची खबर मिळताच अपघात ग्रसतांच्या मदतीला ग्रुप च्या सदस्यांनी घटनास्थली घाव घेतली व जखमीना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले जखमी मधील तीन जनांची प्रकृति गंभीर असल्याने त्याना त्वरित पनवेल येथे हलवन्यात आले आहे,
या मार्गावरुन घाट उत्तरण्यास मनाई असताना ही काही चालक येथून गाड्या खोपोलीत उत्तरवतात व रसत्याच्या उताराचा अंदाज न आल्याने अनेक अपघात येथे होत आहेत दोनच दिवसांपूर्वी येथे प्रवासी बस पलटी होऊन पांच प्रवासी ठार झाले होते, पोलिस प्रशासनाने येथे उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.