ETV Bharat / state

Zebra Fish : स्वत:च्या मेंदू आणि हृदयाला इजा झाल्यास स्वत:च दुरुस्त करणारा 'हा' अनोखा मासा

आपली त्वचा जशी पुनर्जन्म घेऊ शकते त्याचप्रमाणे आपले यकृत देखील अंशतः पुनर्जन्म घेऊ शकते. परंतु इतर अवयवांमध्ये पुनर्जन्म करण्याची क्षमता नाही. विशेष म्हणजे झेब्राफिशचे (zebrafish) सर्व अवयव पूर्णपणे पुनर्जन्म घेऊ शकतात.

Zebrafish
Zebrafish
author img

By

Published : Nov 12, 2022, 8:01 PM IST

पुणे - माणसाच्या अवयवांना इजा झाल्यास ते अवयव सहजासहजी बदलता येत नाहीत. अवयव बदलले तरी माणूस कमजोर होत जातो. त्यात जर मेंदू किंवा हृदयास काही इजा झाल्यास ऑपरेशन अवघड होते. पण निसर्गात एक मासा असा आहे ज्याच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत काहीही इजा झाली किंवा शरीरातील एखादा अवयव खराब झाला की तो लगेच दुरुस्त होतो. अशा या अनोख्या फिशच नाव आहे झेब्राफिश. (zebrafish). याच फिश वर सध्या पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (Agharkar Research Institute) येथे संशोधन केलं जातं आहे.

झेब्राफिश वर स्पेशल रिपोर्ट

कसा असतो झेब्राफिश? - झेब्राफिश हा 2 ते 3 सेमी लांबीचा गोड्या पाण्यातील एक लहान मासा आहे. तो प्रामुख्याने आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो. भारतात पूर्वेकडील हिमालयातील नद्यांमध्ये झेब्राफिश दिसतात. झेब्राफिश हे मत्स्यालयातील प्रसिद्ध मासे आहेत. त्यांचा मत्स्यालय ते संशोधन प्रयोगशाळेपर्यंतचा प्रवास अतिशय मनोरंजक आहे. जॉर्ज स्ट्रायझिंगर या अमेरिकन शास्त्रज्ञाने संशोधनासाठी पहिल्यांदा झेब्राफिशचा वापर केला कारण झेब्राफिश पाळीव प्राण्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होते आणि वाढण्यास आणि राखण्यासाठी अतिशय सोयीस्कर असतो. झेब्राफिश भ्रूण पारदर्शक असतात. त्यामुळे त्याची एक पेशी अवस्थेपासून संपूर्ण वाढ होईपर्यंतच्या विकासाची कल्पना करता येते. साध्या सूक्ष्मदर्शकाखाली झेब्राफिश मधील रक्त वाहताना आणि हृदयाचे ठोके बघता येतात.

झेब्राफिश वर स्पेशल रिपोर्ट
हाच तो झेब्राफिश

झेब्राफिशचे सर्व अवयव पुनर्जन्म घेऊ शकतात - सेंगर इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रकल्पात असे दिसून आले आहे की, अनुवांशिकदृष्ट्या झेब्राफिश मानवांसारखेच असतात. 1990 च्या दशकात ट्युबिंजेन, जर्मनीमधील ख्रिश्चन न्युस्लीन-व्होल्हार्ड आणि बोस्टन, यूएसए येथील वुल्फगँग ड्रायव्हर यांनी झेब्राफिशवर संशोधन सुरू केले. यामुळे या माशाचा विकास आणि पुनरुत्पादन समजण्याचे दोन्ही मार्ग खुले झाले. विकास आणि पुनरुत्पादन अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगायचे तर असे म्हणता येईल की, विकास हा एखाद्या व्यक्तीच्या गर्भापासून पूर्णपणे प्रौढ होण्यापर्यंतचा प्रवास आहे. तर पुनर्जन्म ही स्वयं-उपचार प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्याला दुखापत होते (उदा. त्वचेवर एक कट किंवा ओरखडा) तेव्हा हळूहळू नवीन त्वचा तयार होते. आपली त्वचा जशी पुनर्जन्म घेऊ शकते त्याचप्रमाणे आपले यकृत देखील अंशतः पुनर्जन्म घेऊ शकते. परंतु इतर अवयवांमध्ये पुनर्जन्म करण्याची क्षमता नाही. उदाहरणार्थ हृदय, मेंदू इत्यादी. विशेष म्हणजे झेब्राफिशचे सर्व अवयव पूर्णपणे पुनर्जन्म घेऊ शकतात.

झेब्राफिश वर स्पेशल रिपोर्ट
झेब्राफिशच्या पेशीजाल

झेब्राफिशवर आणखी संशोधन चालू - सध्या पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेत या झेब्राफिश वर संशोधन केलं जात आहे. विशेष म्हणजे हे फिश इथेच तयार होतात. मानव आणि झेब्राफिशचे अवयव सारखेच आहेत. मानवाचा विकास हा झेब्राफिश प्रमाणेच होतो. झेब्राफिशच्या एखाद्या पेशीजालाला दुखापत झाल्यानंतर त्या जागी त्याच जातीचा पेशीजाल तयार होतो. मात्र मानवी शरीरात तसे का होत नाही? झेब्राफिशचे पुनरुत्पादन कसे होते? आणि या प्रक्रियेत कोणते घटक समाविष्ट आहेत? झेब्राफिशवरील संशोधनातून मिळालेले ज्ञान आपण पुनर्जन्म मिळविण्यासाठी वापरू शकतो का? यावर सध्या येथे संशोधन केलं जातं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.