ETV Bharat / state

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी केला जेरबंद - वाकड पोलीस पुणे

शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने एका २० वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. याप्रकरणी चार आरोपींना काही तासात जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.

तरुणाचा खून
तरुणाचा खून
author img

By

Published : Jun 6, 2020, 8:40 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने एका २० वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. याप्रकरणी चार आरोपींना काही तासात जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. ऋषभ गायकवाड (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली.

गुड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. लिंक रोड, चिंचवड), सिजीन फिलिप जॉर्ज (वय २६, रा. काळेवाडी), रोहित ललन सिंग (वय २२, रा. पवनानगर कॉलनी क्र. २, काळेवाडी), सचिन सोनू साठे (वय २६, रा. गणराज कॉलनी, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रमोद किसन गायकवाड यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा चुलत भाऊ ऋषभ गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून बदला घेण्याच्या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथील जगतापनगरमध्ये आरोपींनी धारदार कोयत्याने ऋषभ याच्यावर वार करून व दगडाने ठेचून जीवे ठार मारले. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी वाकड पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींना अवघ्या १२ तासाच्या आत अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.