राजगुरूनगर (पुणे) - राजगुरुनगरजवळील डुम्या डोंगराच्या पायथ्याखाली 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार (दि. 5 जाने.) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे राजगुरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. राहुल बाबाजी सावंत, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दारू पाजून हत्या
डुम्या डोंगर परिसरात सायंकाळ व पहाटेच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक फिरायला जात असतात. याच डोंगरांच्या पायथ्याखाली जंगल परिसरात डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. जवळच्याच व्यक्तीने दारू पाजून ही हत्या केल्याचा अंदाज राजगुरुनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी (दि. 4 जाने.) संध्याकाळच्या सुमारास राहुलने मद्यपान केले त्यानंतर डुम्या डोंगराजवळील जंगल परिसरात गेल्यावर राहुलच्या डोक्यात व तोंडावर दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. डुम्या डोंगर परिसरात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.
हेही वाचा - पाटेठाणमधून अवैध दारूसाठा जप्त, एकाला घेतले ताब्यात
हेही वाचा - गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल