पुणे- येथील शिरुर तालुक्यातील वढू बुद्रूकमध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गाव दारूमुक्त करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. तरुणांनी गावातील अवैध हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. गाव दारूमुक्त करण्यासाठी तरुणांसह महिलांच्या मार्गदर्शनाखाली याआधी दोन वेळेस दारूबंदी करण्यात आली होती.
हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
विशाल शिवले, योगेश भंडारे, अक्षय कोबल, अजय शिवले, उमेश भंडारे यांसह अनेक तरुणांनी वेळोवेळी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाला याप्रकरणी तक्रार केली होती. परंतु, दारू विक्रीवर काहीच परिणाम झाला नव्हता. राजरोसपणे दारू विक्री सुरू होती. यामुळे गावातील तरूणांनी एकत्र येत दारू बंद करण्याचे ठरवले. त्यांनी दारूभट्टी विक्रीच्या अड्ड्यांवर जाऊन तोडफोड करून दारूबंदी केली.