ETV Bharat / state

सावकारकीच्या पैशातून इंदापुरात युवकाला जीवंत जाळले; रुग्णालयात मृत्यू - इंदापूर तालुक्यातील घटना

पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्या युवकाला जीवंत जाळल्याची घटना इंदापूर तालुक्यातील जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत युवक ९५ टक्के भाजल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर युवकाचा मृत्यू झाला.

पैशातून इंदापुरात युवकाला जीवंत जाळले;
पैशातून इंदापुरात युवकाला जीवंत जाळले;
author img

By

Published : Jun 25, 2021, 12:28 PM IST

बारामती - बेकायदेशार सावकारकीच्या पैशासाठी एकाचा खून करून त्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या खासगी सावकाराने एका साथीदाराच्या मदतीने निमगाव केतकी येथील २७ वर्षीय युवकाचे पैशासाठी अपहरण केले. तसेच पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्या युवकाला जिवंत जाळल्याची घटना इंदापूर तालुक्यातील जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत युवक ९५ टक्के भाजल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकत जेरबंद केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.

नवनाथ हणुमंत राऊत (वय-३२, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) आणि सोमनाथ भिमराव जळक (वय३१, रा.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर) असे मृताचे नाव आहे.

पेट्रोल ओतून दिले पेटवून-

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जून २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिवराज हेगडे हा निमगाव येथील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी वरील आरोपींनी त्याला पाठीमागून बंदुक लावून, चारचाकी वाहनात बसवत त्याचे अपहरण केले. त्यानंतर तुझ्याकडून आणखी काही पैसे निघतात, असे म्हणून १३ दिवस अज्ञातस्थळी एकाच खोलीत डांबुन ठेवले होते. त्यानंतर २० जूनला वरील आरोपींनी शिवराम हेगडे याला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

सोलापूर सिव्हिल रुग्णालयात मृत्यू-

या घटनेत शरीर पेटल्यानंतर हेगडे याने जमिनीवर लोळुन आग विझवली आणि रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हेगडे याच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. त्यादरम्यान हेगडेने पोलिसांना लेखी जबाब दिला आहे. मात्र, परंतु उपचारादरम्यान जखमी हेगडेचा मृत्यू झाला. हेगडेच्या मृत्यूनंतर इंदापूर पोलिसांनी आरोपीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे हे करत आहेत.

यापूर्वीही केला होता एकाचा खून-

सोमनाथ भिमराव जळक व तक्रारदार शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मागील काही दिवसांपूर्वी या दोघांनी मिळून सावकारकीच्या पैशासाठी त्यांच्याच एका मित्राच्या डोक्यात दगड घालत त्याचा खून करून मृृृृतदेह निमगाव केतकी येथील विहिरीत फेकून दिला होता. त्यावेळी इंदापूर पोलिसांनी दोघांनाही ३०२ च्या गुन्ह्यात अटक करुन जेलमध्ये टाकले होते. काही दिवसानंतर दोघेही जामिनावर बाहेर आले होते. तर सोमनाथ जळक व नवनाथ राऊत हे सराईत गुन्हेगार व खासगी सावकार असुन त्यांनी अनेक गोरगरीबांच्या शेतजमिनी व जागा व्याजाच्या पैशात बळकावल्याची शक्यता आहे. त्यातुनच सोमनाथ जळकने पैशाच्या जोरावर दुसरा खून केल्याची चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.