ETV Bharat / state

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन... - श्रीकांत काकडे

Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा समाजातील तरुण देखील आक्रमक झाले आहेत. आळंदीत श्रीकांत काकडे या तरुणाने चक्क शोलेस्टाईल आंदोलन (Sholay Style Protest) करत पोलिसांसह कुटुंबाची धाकधूक वाढवली आहे.

Maratha Reservation
शोले स्टाइलने केलं आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:59 PM IST

पिंपरी चिंचवड Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असतांना आता राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा कार्यकर्ते उपोषण करत नेत्यांना गावबंदी केल्याची भूमिका घेत आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे या मागणीसाठी आत्महत्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे. पण अद्याप यावर तोडगा निघाला नाही. पुण्यातील तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईलने आंदोलन (Sholay Style Protest) करण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. असं आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. श्रीकांत काकडे असं या तरुणाचा (Srikanth Kakade) नाव आहे.

तरुण हातात पोस्टर : आळंदी मधील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर ही घटना घडली. श्रीकांत काकडे हा तरुण हातात ‘एक मराठा, लाख मराठा, मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेला फलक घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. टाकीवर जात असताना तरुणाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी हे पाउल उचलले असल्याचं म्हटलं आहे.

तोपर्यंत खाली उतरणार नाही : श्रीकांत काकडे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये श्रीकांत याने म्हटलं आहे की, हे सरकार मराठ्यांना वेशीला टांगत आहे. मराठ्यांना आत्महत्या करण्यास हे सरकार प्रवृत्त करीत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तरुणांच्या भावना तीव्र होत आहेत. सरकारने याची त्वरित दखल घेतली पाहिजे. आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज या नेत्यांना फिरू देणार नाही. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही.

आंदोलकास खाली उतरण्याची विनंती : हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला. त्यानंतर आळंदी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, मराठा आंदोलक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांकडून श्रीकांत याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सकल मराठा बांधव, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहे. आंदोलकास खाली उतरण्याची विनंती करत आहे.

हेही वाचा -

  1. Lathicharge in Jalna: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं आंदोलकांसह पोलीसही जखमी
  2. Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील घोटभर पाणी प्यायले; भावनिक न होण्याचं केलं आवाहन
  3. MP Hemant Patil Resign : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा; दिल्लीत करणार उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.