पुणे: याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासात आरोपी सुमित बाळासाहेब जेबे (वय.26,रा. संगमवाडी ढोलेपाटील रोड, मुळ.औरंगाबाद) याला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. अखेर आरोपी जेबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर संबधित तरुणीला वेळोवेळी धमकावून फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देत आरोपीने 1 लाख 38 हजार रुपये उकळले.
ओळखीतून झाला घात: याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकते. तिचा लहान भाऊ देखील पुण्यात शिक्षण घेतो. एखाद्या नामांकित शैक्षणिक क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी तो धडपडत होता. विशेष म्हणजे आरोपी जेबे हा त्या क्लासेसमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होता. प्रवेशाच्या चौकशीदरम्यान दोघांचा परिचय झाला होता. फिर्यादी तरुणी आणि तिचा भाऊ पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचा परिचय वाढत गेला. पुढे क्सासेसच्या नोट्स देणे घेण्यातून जेबे याने संबंधित तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
अखेर पोलिसात तक्रार: तरुणीला हे समजले तेव्हा त्याने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर फोटो घरच्यांना आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर देखील त्याने तरुणीला धमकावून वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून पैसे उकळले. मात्र सतत होणार्या त्रासाला कंटाळून तरुणीने एके दिवशी हा प्रकार आपल्या घरच्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार: हैदराबादमधील बंजारा हिल्स भागात एका शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चालकाने चार वर्षांच्या एलकेजी विद्यार्थिनीवर 19 ऑक्टोबर, 2022 रोजी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. चालकाच्या कृत्यामुळे चिमुकली मुलगी बेशुद्ध झाली होती. आईने मुलीला विचारले असता तिला घडलेला प्रकार कळला.
दोन महिन्यांपासून सुरू होते गैरवर्तन: घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातेवाईक आणि मित्रांनी चालक रजनी कुमारला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांची एलकेजी मुलगी बंजारा हिल्स येथील शाळेत शिकत होते. शाळेच्या मुख्याध्यापकाचा ड्रायव्हर सुमारे दोन महिन्यांपासून मुलीशी गैरवर्तन करत होता. या घटनेमुळे संतप्त कुटुंबीयांनी एकदा शाळेच्या मुख्याध्यापकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला.