पुणे - चासकमान धरणातून १६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भिमा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे खरपुडी येथील भिमा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. याच पुलावरून जात असताना एक जण वाहून गेल्याची घटना घडली. आझाद नारायण गाडे, असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या धरणातील पाणी भिमा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे भिमा नदी दुथडी भरून वाहत आहे. या काळात कुणीही याठिकाणाहून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. तरीदेखील या तरुणाने पुलवारून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भिमेच्या पुरात वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.