दौंड (पुणे) - भाईगिरी करणाऱ्या आणि सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही. अशा गावगुंड आणि भाईंवर तडीपारी आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा यवत पोलिसांनी ( yawat police warning to action ) दिला आहे.
गुन्हेगारांवर कठोर पावले उचलणार -
गावात काही टवाळखोर आणि गावगुंड यांमुळे गावातील वातावरण बिघडते. शाळा महाविद्यालयाच्या आवारात फिरणारे रोड रोमिओ, महिलांची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये सामाजिक सलोखा रहावा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. यासाठी कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. गावगुंडांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा समाजकंटकांनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या सर्व प्रकाराला आळा बसावा. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातील नागरिकांना गाव गुंडापासून मोकळा श्वास मिळावा यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
गुन्हेगारावर मोक्काअंतर्गत कारवाई करणार -
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. या आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून नजर ठेवण्यात येणार आहे. बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या लोकांची माहिती मिळवण्यासाठी गोपनीय माहितीसाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. भाईगिरी करून दहशत करणारे गावगुंड विद्यार्थिनी महिलांची छेडछाड करणारे टवाळखोर रोडरोमिओ चोऱ्यामाऱ्या करणारा चोर अशा गुंडांवर यापुढे तडीपारी, एमपीडीए मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - Monkey Fever Disease : केरळात कोरोनानंतर माकड ताप आजाराचा धोका; जाणून घ्या काय आहे हा रोग