दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील खोर गावच्या हद्दीत ओढ्याच्या कडेला सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलीस आणि महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी एकूण २५ लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली. अवैध वाळू उपसाप्रकरणी जमीन मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोर गावचे हद्दीत पाटलाचीवाडी येथे ओढ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जेसीबी मशीनच्या साहयाने काही लोक वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा मारला.
त्यावेळी मारुती केशव चौधरी (रा.पाटलाचीवाडी खोर ता.दौंड जि. पुणे) यांच्या मालकीच्या पिंपळाचीवाडी येथील जमीन गट नं. 318 मध्ये मोहन गेमु राठोड (रा. खिंडीचीवाडी, खोर ता.दौंड जि.पुणे मुळ रा.तिरतांडा ता.गुलबर्गा जि.आळंद), सुधीर चंद्रकांत चौधरी आणि रूपेश दिलीप चौधरी यांच्या सांगण्यावरून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत होता. वाळू उपसा करून तसचे पर्यावरणाला हानी पोहचवून अवैधरित्या वाळूसाठा करीत असताना मिळून आले आहेत. पोलीस पथकास एक पिवळ्या रंगाचा जे.सी.बी आणि एक न्यु हाॅलंड कंपनीचा ट्रॅक्टर असा सुमारे 25 लाख रुपये किमतीची वाहने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी खोरचे तलाठी बापू राजाराम देवकाते यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे .
दौंड : अवैध वाळू उपशावर यवत पोलिसांची कारवाई; २५ लाख रुपयांची वाहने जप्त, चार जणांवर गुन्हा दाखल
दौंड तालुक्यातील खोर गावच्या हद्दीत ओढ्याच्या कडेला सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलीस आणि महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी एकूण २५ लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.