ETV Bharat / state

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीची पूजा संपन्न

कोरोनाचे सावट अद्याप कायम असल्याने गर्दी टाळुन कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी भीमाशंकर व परिसरातील गावांमध्ये तीन दिवस संचार बंदीचे आदेश लागु केले आहेत. तसेच मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीला भक्तांविना मंदिर परिसर सुना आहे.

भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीची पूजा संपन्न

author img

By

Published : Mar 11, 2021, 1:11 PM IST

पुणे - जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने विधिवत पूजाअर्चा संपन्न झाली. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
राजेश देशुमख त्यांच्या पत्नी तसेच भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक ही पूजा करण्यात आली. मोजक्या नागरिकांच्या तसेच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत ही पूजा करण्यात आली. यावेळी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला तसेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना येण्यास मनाई करण्यात आली होती.

भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीची पूजा संपन्न
भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीची पूजा संपन्न

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इतिहासात पहिल्यांच शिवभक्तांविना महाशिवरात्र साजरी करावी लागली आहे. महाशिवरात्री निमित्त देशभरात लाखोंच्या संख्येने भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनाचे सावट अद्याप कायम असल्याने गर्दी टाळुन कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी भीमाशंकर व परिसरातील गावांमध्ये तीन दिवस संचार बंदीचे आदेश लागु केले आहेत. तसेच मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीला भक्तांविना मंदिर परिसर सुना आहे.

इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांना बंदी-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला भक्तांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. 10 मार्च ते 12 मार्चपर्यंत हे संचारबंदीचे आदेश लागु करण्यात आले आहेत. तसेच पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही, याबरोबरच भीमाशंकर परिसरातील पर्यटनावरही तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. इतर गावांतील शिवमंदीरातही गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.