ETV Bharat / state

जागतिक चिमणी दिवस विशेष, 'हे' आहे महाराष्ट्रातील चिमण्यांचे गाव - पिसावरे चिमण्यांचे गाव

आज जागतिक चिमणी दिवस आहे. चिमण्यांची संख्या वाढावी त्यांचं संरक्षण व्हावं या करता अनेक जण प्रयत्न करत असतात. मात्र पुणे जिल्ह्यात एक अंस गाव आहे, जे गाव चिमण्यांच गाव म्हणून ओळखलं जातं. पाहुयात महाराष्ट्रातील एकमेव चिमण्यांच्या गावावरील हा खास रिपोर्ट

पिसावरे गावाला मिळाली चिमण्यांचे गाव म्हणून ओळख
पिसावरे गावाला मिळाली चिमण्यांचे गाव म्हणून नवी ओळख
author img

By

Published : Mar 20, 2021, 6:43 PM IST

पुणे - आज जागतिक चिमणी दिवस आहे. चिमण्यांची संख्या वाढावी त्यांचं संरक्षण व्हावं या करता अनेक जण प्रयत्न करत असतात. मात्र पुणे जिल्ह्यात एक अंस गाव आहे, जे गाव चिमण्यांच गाव म्हणून ओळखलं जातं. पाहुयात महाराष्ट्रातील एकमेव चिमण्यांच्या गावावरील हा खास रिपोर्ट

गावात चिमण्यांची संख्या 3 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर

भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव चिमण्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. पिसावरे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने चिमण्यांची संख्या वाढावी व त्यांचे संरक्षण व्हावं या करता, अनेक वर्षांपासून प्रयत्न केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून आता या पिसावरे गावात चिमण्यांची संख्या 3 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणूनच पिसावरे हे गाव चिमण्यांचे गाव म्हणून ओळखलं जात आहे. गावातील प्रत्येक घरासमोर विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी घरटी बांधून, अन्नपाण्याची सोय केली आहे. हे विद्यार्थी चिमण्यांविषयी गावातील लोकांना माहिती देखील देतात.

पिसावरे गावाला मिळाली चिमण्यांचे गाव म्हणून नवी ओळख

चिमण्यांचे गाव म्हणून ओळख

गावातील चिमण्यांची संख्या पाहाता या पिसावरे गावाला चिमण्यांचे गाव म्हणून आता ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांबरोबरच गावातील नागरिक ही चिमण्यांची काळजी घेत आहेत. चिमण्यांसाठी अन्नपाण्याची सोय केली जात आहे. त्यामुळे या गावात येताच चिमण्यांची चिवचिवाट हमखास कानी पडते. गावाला मिळालेल्या या नव्या ओळखीला ग्रामस्थांना अभिमान वाटतो.

प्रशासनाकडून अधिकृत घोषणा

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून, पिसावरे हे गाव चिमण्यांचे गाव असल्याची अधिकृत घोषणा आज प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, जगायचे असेल छान तर भागवा चिमण्यांची तहान, गायचे असेल गाणे तर चिमण्यांना द्या दाणे असा सल्ला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येतो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.