ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय 'हॉर्टीप्रोइंडिया हॉर्टीकल्चर'चे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी; देश-विदेशातील नागरिक सहभागी - प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीसाठी वापर

Horticulture Exhibition In Pune : पुणे शहरात जागतिक दर्जाचे बागायती फलोत्पादन प्रदर्शन भरविण्यात आलंय. 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालणार असून सर्वांना मोफत पाहता येणार आहे. याला 'हॉर्टीप्रोइंडिया' असं नाव देण्यात आलंय.

Horticulture Exhibition In Pune
आंतरराष्ट्रीय हॉर्टीप्रोइंडिया हॉर्टीकल्चरचे प्रदर्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 8:54 PM IST

Updated : Nov 23, 2023, 10:29 PM IST

आंतरराष्ट्रीय 'हॉर्टीप्रोइंडिया हॉर्टीकल्चर'चे प्रदर्शन पुण्यात

पुणे Horticulture Exhibition In Pune : महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन, असोसिएशन ऑफ एनवायरमेंटल हॉर्टिकल्चर आणि वसू इव्हेंट तसेच हॉस्पिटॅलिटी यांच्यावतीनं भारतातील सर्वात मोठे 'आंतरराष्ट्रीय हॉर्टीप्रोइंडिया' (World Class Horticultural Exhibition) फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाला आज सुरूवात झाली आहे. याचं उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडलं. यात भारतातील जवळपास 300 तर परदेशी 60 हून अधिक नर्सरी करणारे व्यावसायिक यात सहभागी झाले आहेत. जगातील तसेच देशातील विविध फुले आणि त्यांची केलेली उत्कृष्ठ सजावट नर्सरीमध्ये पाहायला मिळाली.

कृषी क्षेत्रात व्यवसायाची संधी : आमदार अशोक पवार म्हणाले की, मार्को कोंटी, मारियानो टार्टाग्लिया जर्मनी, पिम वेंडर नॅप, बर्ट व्हॅन स्पिजक नेदरलँड्, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाल अशा परदेशातून अनेकांनी 'हॉर्टीप्रोइंडिया' प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यानं, भारतासाठी येणाऱ्या कृषी क्षेत्रात मोठी व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे. अश्या या हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. यावेळी कोंजेटी, श्रद्धा रासने, महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, विजय रासने, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्लास्टिकच्या फुलांवर बंदी : प्रत्येक सणांमध्ये सर्रासपणे प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीसाठी वापर केला जातो. त्यामुळं पर्यावरणाला हानी पोहचते. जशी सरकारने प्लास्टिक बंदी केली, तशीच प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यात यावी यासाठी अधिवेशनात विषय मांडणार असल्याचं आमदार अशोक पवार यांनी सांगितलं

भारतातील सर्वांत भव्य प्रदर्शन : हॉर्टीकल्चर क्षेत्रामध्ये वैविधता आल्यानं सर्व स्तरातून मागणीचे प्रमाण वाढलं आहे. हे प्रदर्शन फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि ग्रीनहाउस टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चरल प्रॉडक्ट्स, फार्म मशिनरीज आणि प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजीज या क्षेत्रासाठी 'भारतातील सर्वांत भव्य प्रदर्शन' म्हणून ओळखले जाते. या प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणांमध्ये उत्पादने आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये फुले, फळे, भाज्यांची रोपे, औषधी वनस्पती आणि सजावटीचे रोपे, आंतरराष्ट्रीय फुले तसेच हायड्रोपोनिक्स, सौरऊर्जेचे तंत्रज्ञान, प्लांट टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीनहाउस तंत्रज्ञान, ऑटोमेशन आदी गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात आल्यात.

हेही वाच -

  1. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून फुले, फळांचे प्रदर्शन, 'या'च्या वापराने नागरिकांमध्ये रोष
  2. मंचर येथे भव्य कृषी प्रदर्शन; शेतकऱ्यांना मिळत आहे नवनवीन तंत्रज्ञानाची महिती
  3. रामायणाशी संबंधित प्रसंग पाहा कापडी बाहुल्यांचे रूपात; पुण्यात प्रदर्शनाचे आयोजन

Last Updated : Nov 23, 2023, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.