ETV Bharat / state

Pune District Court Notice :  कोर्टाने स्पष्ट केले, महिला वकिलांनी कोर्टाच्या आवारात केसांना वारंवार हात लावू नये

author img

By

Published : Oct 25, 2022, 5:20 PM IST

जिल्हा कोर्टाच्या आवारात महिला वकिलांनी केस नीट करु नयेत ( Women lawyers should not handle hair on court premises ) अशी नोटीस पुणे जिल्हा कोर्टाने काढली होती. त्यावर वादाला ( Controversy after notice of Pune District Court ) सुरवात झाली आहे. महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. ही क्रिया लक्ष विचलित करणारी असल्याचे म्हणत महिला वकिलांना अस् न करण्याची नोटीस कोर्टाने काढली.

Pune District Court Notice
Pune District Court Notice

पुणे - सध्या पुणे शहरात एका विषयाची जास्तच चर्चा होत आहे. ते म्हणजे पुणे जिल्हा कोर्टाने एक नोटीस ( Pune District Court Notice ) काढली आहे. त्या नोटीस नंतर वाद विवादाला सुरवात झाली ( Controversy after notice of Pune District Court ) आहे. कोर्टाच्या आवारात महिला वकिलांनी केस नीट करु नयेत ( Women lawyers should not handle hair on court premises ) अशी नोटीस पुणे जिल्हा कोर्टाने काढली होती. मात्र, आता ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. या निर्णयानंतर आत्ता यावर प्रतिक्रियाची सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. ही क्रिया लक्ष विचलित करणारी असल्याचे म्हणत महिला वकिलांना असे न करण्याची नोटीस कोर्टाने काढली होती.

Pune District Court Notice
महिला वकिलांनी कोर्टाच्या आवारात केसांना वारंवार हात लावू नये, कोर्टाचा अजब निर्णय

मात्र, आत्ता यावरून वेगवेगळे प्रतिक्रिया येत असून काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी विरोध केलं आहे. कोर्टाने जी नोटीस काढली होती त्यात कोर्टाने कोर्टाच डेकोरेम हे पाळलच पाहिजे. या नोटीसमध्ये कोर्टाने म्हटल आहे की कोर्टाच प्रोसेडींग सुरू असताना वारंवार केस बांधणे, केसांवर हात टाकने हे टाळावे. कोर्टाने जी नोटीस काढली आहे ती योग्य आहे. यामुळे कुठल्याही महिलेच्या मूलभूत अधिकाराला धक्का पोहचत नाही. कारण कोर्टाचा डेकोरेम हा सर्वांनी सांभाळला पाहिजे. असे यावेळी फॅमिली कोर्टाचे अध्यक्ष अडव्होकेट वैशाली चांदणे यांनी सांगितल आहे.

पुणे न्यायालयानं 20 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली होती. यामध्ये महिला वकिलांना कोर्टात सुनावणीदरम्यान केस सावरु नये, किंवा नीट करु नये असं सांगितलं होतं. महिलांनी असं केल्यास न्यायालयाच्या कार्यवाहीत लक्ष विचलित होतं. न्यायालयाच्या सुनावणीत अडथळा येतो, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. वरिष्ठ महिला वकिलांनी हा मुद्दा समोर आणला तेव्हा या प्रकरणानं जोर धरला आहे. यावर वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी नोटीशीवर ट्वीट केलं आहे.

आता बघा महिला वकिलांकडून कोण, विचलित होत आहे. असे कॅप्शन देत जयसिंग यांनी कोर्टाच्या नोटीशीचा फोटो जोडला होता. 20 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, "महिला वकील कोर्टात केस सावरतात, त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. त्यामुळे महिला वकिलांनी कोर्टाची कार्यवाही सुरु असताना असं काही करु नये. यासोबतच नोटीसवर पुणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांची स्वाक्षरीही आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.