चेन्नई India Beat Bangladesh : चेन्नई कसोटीत भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. धावांच्या बाबतीत भारताचा बांगलादेशविरुद्धचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. या विजयासह भारतानं 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. बांगलादेशवर भारताचा हा 13वा विजय आहे. भारतानं बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं महाकाय लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात केवळ 234 धावा करु शकला आणि सामना गमावला. अश्विन दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं 6 बळी घेतले. बांगलादेशची शेवटची विकेट रवींद्र जडेजानं घेतली.
Victory by 2⃣8⃣0⃣ runs in the 1st Test in Chennai 🙌#TeamIndia take a 1⃣-0⃣ lead in the series 👏👏
— BCCI (@BCCI) September 22, 2024
Scorecard ▶️ https://t.co/jV4wK7BOKA #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/wVzxMf0TtV
कानपूरला होणार दुसरी कसोटी : चेन्नई कसोटीतील पराभवामुळं बांगलादेशची भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकण्याची इच्छा अजूनही अपूर्ण आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटी चार दिवसही टिकली नाही. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात खेळ संपला. आता दोन्ही संघांमधील दुसरी आणि शेवटची कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे.
Jadeja wraps things up in style! 😎
— BCCI (@BCCI) September 22, 2024
It's all over in Chennai 🙌#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1ChxakWLfL
भारताच्या पहिल्या डावात 376 धावा : चेन्नई कसोटीत बांगलादेशनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. अवघ्या 34 धावांवर रोहित, गिल आणि विराटच्या विकेट घेतल्यावर त्यांचा हा निर्णयही सार्थ ठरत असल्याचं दिसून आले. मात्र यानंतर भारताचा डाव पंत आणि यशस्वीनं सांभाळला, जो अश्विन आणि जडेजा या जोडीनं केलेल्या अप्रतिम फलंदाजीमुळे आणखी मजबूत झाला. पहिल्या डावात अश्विननं 113 धावा केल्या तर जडेजा 86 धावा करुन बाद झाला. याशिवाय यशस्वी जैस्वालनं 70 धावांची खेळी केली. परिणामी भारतीय संघानं 376 धावांची मोठी धावसंख्या उभारली. बांगलादेशकडून पहिल्या डावात सर्वात यशस्वी गोलंदाज हसन महमूदनं 5 बळी घेतले.
6⃣ wickets in the morning session on Day 4 🙌
— BCCI (@BCCI) September 22, 2024
Bangladesh 234 all out in the 2nd innings.
A dominating win for #TeamIndia! 💪
Scorecard ▶️ https://t.co/jV4wK7BOKA#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TR1RoEDyPB
भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी : भारताच्या 376 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव केवळ 149 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात गोलंदाजीत 4 विकेट घेतल्या. तर आकाशदीप, जडेजा आणि सिराजने 2-2 विकेट घेतल्या. भारताला पहिल्या डावात 227 धावांची भक्कम आघाडी मिळाली होती.
A game-changing TON 💯 & 6⃣ Wickets! 👌 👌
— BCCI (@BCCI) September 22, 2024
For his brilliant all-round show on his home ground, R Ashwin bags the Player of the Match award 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/jV4wK7BOKA #TeamIndia | #INDvBAN | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Nj2yeCzkm8
पंत आणि गिलची दुसऱ्या डावात शतकं : पहिल्या डावात 227 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतानं दुसरा डाव 4 गड्यांच्या मोबदल्यात 287 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशसमोर 515 धावांचं लक्ष्य ठेवले. भारतासाठी अश्विननं पहिल्या डावात शतक ठोकले तर पंत आणि गिलनं दुसऱ्या डावात शतकं झळकावली. ऋषभ पंत 109 धावा करुन बाद झाला तर शुभमन गिल 119 धावा करुन नाबाद राहिला.
अश्विन भारताच्या विजयात सामनावीर : भारतानं दिलेल्या 515 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर बांगलादेश दुसऱ्या डावात विजयापासून 280 धावा दूर राहिला. पहिल्या डावात विकेट घेण्यात अपयशी ठरलेला अश्विन दुसऱ्या डावात संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दुसऱ्या डावात त्यानं 6 बळी घेतले. चेन्नई कसोटीत शतक आणि 6 विकेट्स घेतल्याबद्दल त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अश्विनशिवाय जडेजा हा दुसऱ्या डावात 3 बळी घेणारा दुसरा यशस्वी गोलंदाज होता.
हेही वाचा :