ETV Bharat / state

पुणे : दुचाकी आणि टॅंकरच्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

author img

By

Published : Jan 14, 2021, 10:56 PM IST

बिरोबीवाडी येथे आज सकाळी दुचाकी आणि टॅंकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी जखमी झाला आहे.

women died in accident between two wheeler and tanker at birobiwadi in pune
पुणे : बिरोबावाडी येथील दुचाकी आणि टॅंकरच्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

दौंड (पुणे) - पाटस ते दौंड राज्यमार्गावरील बिरोबीवाडी येथे आज सकाळी दुचाकी आणि टॅंकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कावेरा मनोहर देडगे (55) रा.बालेवाडी पुणे, असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमी झालेला व्यक्ती हा या महिलेचा पती असून हे दोघे पती पत्नी परांडा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी जात होते.

टँकर ने स्कुटीला धडक दिल्याने अपघात -

दोघे पती पत्नी पाटसकडून दौंडकडे जात असताना समोरुन येणाऱ्या टॅंकरने स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला ही टॅंकरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्या आधीच तिचा मृत्यू झाला. तर तिच्या पतीला डोक्याला, पायाला, हाताला मार लागल्याने ते गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच टॅंकरचालकास टॅंकरसह ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - मोनालिसा बागलचा मराठमोळा साज, फोटोज शेअर करत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.