ETV Bharat / state

पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकच्या आईच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, जागीच मृत्यू - पुण्यातील क्राईम

पुणे शहरातल्या वारजे भागात एका ज्येष्ठ महिलेचा खून केल्याची घटना समोर आलीये. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. शाबाई शेलार (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचं नाव आहे.

पुणे शहरात महिलेचा डोक्यात रॉड मारून खून

author img

By

Published : May 8, 2021, 5:36 PM IST

Updated : May 8, 2021, 6:54 PM IST

पुणे - पुणे शहरातल्या वारजे भागात एका ज्येष्ठ महिलेचा खून केल्याची घटना समोर आलीये. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. शाबाई शेलार (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचं नाव आहे. त्या सातारा येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या मातोश्री आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहराच्या मध्य भागात पोलीस हवालदाराच्या खूनाची घटना ताजी असतानाच, सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठ महिलेचा खून

डोक्यात रॉड मारल्याने जागीच मृत्यू

अज्ञात हल्लेखोरांनी या महिलेच्या डोक्यात रॉड मारल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. रामनगर परिसरातील भाजी मंडईजवळ शाबाई शेलार यांचा भंगारचा व्यवसाय आहे. पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी एक जण भंगार विकण्यासाठी आला होता. त्यावेळी शाबाई शेलार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. भंगार विकण्यास आलेल्या व्यक्तीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाबाई शेलार यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले, पण त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. दरम्यान या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस अधिकारी याचा तपास करत आहेत.

हेही वाचा - सलाम! नगरमध्ये कर्तव्यदक्ष मुलाने केली भाजीपाला विक्रेत्या आईवर कारवाई

Last Updated : May 8, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.