ETV Bharat / state

पिसाळलेला कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू - dog news baramati

५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिपाली पतीसमवेत दुचाकीवर निघाल्या होत्या. यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या कुत्र्याने दिपाली यांच्या हाताला चावा घेतला. ५ नोव्हेंबर दिवाळीनंतर सुरू झालेला शाळेचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी, नागरिकांसह २५ जणांना चावा घेतला होता. याच दिवशी दिपाली यांना देखील चावा घेतला होता.

woman-dies-after-biting-dog-in-baramati-pune
पिसाळलेला कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Nov 27, 2019, 9:48 AM IST

पुणे - शहरातील देवतानगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या महिलेचा ‘रेबीज’ने मृत्यू झाला. महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. दिपाली धनंजय जाधव (वय २७) असे या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- केवळ फडणवीसच नाहीत, तर 'हे' आहेत देशभरातील 'औटघटके'चे ठरलेले मुख्यमंत्री

५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिपाली पतीसमवेत दुचाकीवर निघाल्या होत्या. यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या कुत्र्याने दिपाली यांच्या हाताला चावा घेतला. ५ नोव्हेंबर दिवाळीनंतर सुरू झालेला शाळेचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी, नागरिकांसह २५ जणांना चावा घेतला होता. याच दिवशी दिपाली यांना देखील चावा घेतला होता. यानंतर त्यांनी उपचारापोटी दहा इंजेक्शन घेतली होती. मात्र, ते उपचार परिणामकारक ठरू शकले नाहीत.

काही दिवसांपूर्वी दिपाली यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बारामती शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिपाली यांना तातडीने पुण्यात उपचारासाठी हलविण्यास सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (दि. २४) पुणे शहरातील रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार होणार नसल्याने त्यांना ससूनमध्ये नेण्याचा सल्ला पुण्यातील डॉक्टरांनी दिला. त्याच दिवशी ससून रुग्णालयात त्यांना दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. रेबीजचा आजार बळावल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दिपाली यांचा सोमवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती धनंजय तसेच अडीच वर्षांची मुलगी आहे.

Intro:Body:महिलेचा ‘रेबीज’ने मृत्यु 

बारामती-   

 पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या विवाहितेचे नुकताच उपचारा दरम्यान ‘रेबीज’ने मृत्यु झाला. महिलेवर  ससुन रुग्णालयात उपचार सुरु होते. 

बारामती शहरातील देवतानगर मध्ये दिपाली धनंजय जाधव (वय २७) असे या महिलेचे नाव आहे. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्या पतीसमवेत दुचाकीवर निघाल्या होत्या. यावेळी अचानक पाठीमागुन आलेल्या कुत्र्याने दिपाली यांना हाताला चावा घेतला. ५ नोव्हेंबर दिवाळीनंतर सुरु झालेल्या शाळेचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी, नागरीकांसह २५ जणांना  चावा घेतला होता.  याच दिवशी दिपाली यांना देखील चावा घेतला होता. यानंतर त्यांनी उपचारापोटी त्यांनी दहा इंजेक्शन घेतली होती. मात्र, ते उपचार परीणामकारक ठरु शकले नाही. काही दिवसांपुर्वी दिपाली यांना अचानक अस्वस्थ वाटु लागल्याने बारामती शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिपाली यांना तातडीने पुण्यात उपचारासाठी हलविण्यास सांगितले. त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी(दि २४) पुणे शहरातील रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. मात्र,खासगी रुग्णालयात उपचार होणार नसल्याने त्यांना ससुनमध्ये नेण्याचा सल्ला पुण्यातील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी  दिला. त्याच दिवशी ससुन रुग्णालयात त्यांना दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. रेबीजचा आजार बळावल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दिपाली यांचा सोमवारी सकाळी  दुर्देवी मृत्यु झाला. त्यांच्या मागे पती धनंजय तसेच अडीच वर्षांची मुलगी आहे.

 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.