पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले यावेळी त्यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली त्याच बरोबर राणेशाहीचे राजकारण संपवण्याच्या लढ्यात साथ देण्याचे आवाहनही केले यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहना नुसार फडणवीस राजीनामा देणार का अशा खोचक प्रश्न विचारला आहे
देवेद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे आमदार होते काकु शोभाताई फडणवीस या माजी मंत्री होत्या देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री याचे काय वाट पाहुयात आता मोदी साहेबांना त्यांच्या पक्षातून आणि महाराष्ट्रातून सुरुवात कधी करताहेत याची अशा आशयाचे ट्विट रुपाली पाटील यांनी केले आहे पतंप्रधानांच्या आवाहनाला मान देत फडणवीस राजीनामा देतील का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे
लाल किल्ल्यावरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की भारतापुढे भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही सर्वात मोठी दोन आव्हाने आहेत भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केले आहेत