ETV Bharat / state

Wife Killed Husband: पत्नीने प्रियकराशी संगनमत करून केला नवऱ्याचा खून, दहा महिन्यांनंतर अटक - wife killed her husband

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने व प्रियकराने मिळून खून केल्याची घटना वडगाव निंबाळकर परिसरात घडली आहे. (wife killed her husband). स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी (Vadgaon Nimbalkar Police) आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Wife Killed Husband
Wife Killed Husband
author img

By

Published : Nov 2, 2022, 5:19 PM IST

बारामती: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने व प्रियकराने मिळून खून केल्याची घटना वडगाव निंबाळकर परिसरात घडली आहे. (wife killed her husband). स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी (Vadgaon Nimbalkar Police) आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी दहा महिन्यांपासून फरार: वडगाव निंबाळकर येथील एका व्यक्तीच्या खूना प्रकरणी दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या चार आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रोहित दत्तात्रय खोमणे, वृषाली वैभव यादव, शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सुर्यवंशी (वय २३) व सागर सर्जेराव चव्हाण (वय २७) (सर्व रा. वडगाव निंबाळकर,ता.बारामती) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. वृषाली यादव यांनी त्यांचे पती वैभव यादव हे बेपत्ता असल्याची तक्रार १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता.

पोलीसांची सापळा रचून अटक: पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना तपासात वृषाली हिने प्रियकर रोहित खोमणे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वडगाव निंबाळकर बस स्थानक परिसरात सापळा रचत या चौघांना अटक केली. चौकशीमध्ये त्यांनी वैभव यादव याला मारहाण करून पाडेगाव (ता.फलटण) येथे कालव्यामध्ये फेकून दिल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता लोणंद पोलिस ठाण्यात त्यासंबंधी अकस्मात मृत्यू दाखल असल्याचे तसेच मृतकाची ओळख पटली असल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.