ETV Bharat / state

Whale Vomit Smuggling : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे डेक्कन पोलिसांच्या जाळ्यात; 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त - व्हेल उलटीची तस्करी

पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जण तब्बल 5 कोटीपेक्षा (piece of whale vomit seized) जास्त रकमेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक (Whale vomit smugglers arrested) केली आहे. आम्ही व्हेल माशाची उलटी ही विक्री करण्याकरिता आणली असल्याचे सांगून त्याने रस्त्याच्या कडेला त्यांना उलटी विक्री करण्याकरिता मदत करणारे दोन जण थांबलेले आहेत असे सांगितले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Whale Vomit Smuggling
आरोपींना अटक
author img

By

Published : Nov 30, 2022, 6:01 PM IST

पुणे : व्हेल माशाच्या उलटीला भारतात व्यापार (whale vomit smuggling) करण्यासाठी बंदी आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जण तब्बल 5 कोटीपेक्षा (piece of whale vomit seized) जास्त रकमेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक (Whale vomit smugglers arrested) केली आहे. Latest news from Pune, Pune crime

संदीप सिंह गिल्ल अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर

ही आहेत आरोपींची नावे : राजेंद्र राकेश कोरडे, वय २८, रा- मु.पो- अजंले ता- दापोली, जि-रत्नागिरी, २. नवाज अब्दुला कुरुपकर, वय २४, रा. मु.पो - अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि- रत्नागिरी ३. अजिम महमुद काजी, वय ५० वर्षे, रा.मु.पो - अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि- रत्नागिरी यांनी घेऊन येऊन इसम नामे ४. विजय विठ्ठल ठाणगे, वय-५६, धंदा- व्यवसाय, रा- चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं २०३, धनकवडी, पुणे ५. अक्षय विजय ठाणगे, वय- २६ रा अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

अशाप्रकारे केली आरोपींना अटक : डेक्कन पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत व्हेल माशाची करोडो रुपये किंमतीच्या उलटीची तस्करी होणार आहे. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन एक पथक तयार केले आणि मिळालेल्या खबरीनुसार फग्युर्सन कॉलेज बसस्टॉपच्या मागील बाजुस तीन इसम संशयास्पद स्थितीत उभे असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या बॅगची तपासणी केली. दरम्यान त्यांच्या बॅगेमध्ये व्हेल माशाची उलटीचे दोन मोठे तुकडे मिळून आले. यांच्याकडे व्हेल माशाची उलटी ही कशाकरिता आणली याबाबत विचारणा केली. त्यांनी आम्ही व्हेल माशाची उलटी ही विक्री करण्याकरिता आणली असल्याचे सांगून त्याने रस्त्याच्या कडेला त्यांना उलटी विक्री करण्याकरिता मदत करणारे दोन जण थांबलेले आहेत असे सांगितले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मुद्देमाल जप्त : आरोपी राजेंद्र राकेश कोरडे यांच्या ताब्यात असेलेल्या काळया रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा त्याचे वजन २ किलो ९९४ ग्रॅम इतके कि २,९९,४०,०००/- इतकी आहे. तर दुसरा आरोपी नवाज अब्दुला कुरुपकर याच्या ताब्यात असलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये आढळलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याचे वजन २ किलो २८६ ग्रॅम इतके आणि त्याची किंमत २,२८,६०,००० एवढी आहे. तसेच तिसरा आरोपी विजय विठ्ठल ठाणगे याच्या कडील ताब्यात असलेली एक काळया रंगाची हिरोहोंडा स्पेल्डर एन एक्स जी स्मार्ट दुचाकी क्रमांक एम.एच १२ एम. के- ९१९३ अशा वर्णनाची किंमत ३५,००० असा एकूण 5 किलो व्हेल माशाचा उल्टीचे तुकडे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५.२८,३५,००० एवढ्या किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.