ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवार म्हणतील तेच आम्ही करणार- प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंप आणि अजित पवार यांनी बंड करून घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडले आहे. (Maharashtra Political Crisis) अजित पवार आणि शरद पवार यांचे होम ग्राउंड असलेल्या पुण्यात देखील अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Prashant Jagtap On Sharad Pawar) परंतु, आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे बोलवली होती.

Maharashtra Political Crisis
राकॉंची बैठक
author img

By

Published : Jul 4, 2023, 7:03 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील बैठकीनंतर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया

पुणे: अजित पवार आणि शरद पवार दोघेही नेते असले तरीही विचारांची लढाई आहे. (Maharashtra Political Crisis) त्यामुळे आम्ही बहुतांश कार्यकर्ते हे शरद पवार साहेबांसोबत आहोत आणि साहेब म्हणतील तेच आम्ही करणार आहे, (Prashant Jagtap On Sharad Pawar) तसा ठराव आज शहराध्यक्षाच्या कार्यकारणी बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांकडून आता काम चालू आहे त्या संदर्भात ही बैठक आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे.

या कारणाने एनसीपीला काम कारण्यास कमी संधी: अजित पवार यांचा पक्ष जर भाजप सोबत जाणार असेल तर पुणे शहरातील ही बैठक महत्त्वाची आहे. कारण पुणे शहरातले 100 नगरसेवक हे महानगरपालिकेत भाजपाचे होते. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यातल्या संधी खूप कमी आहेत. हे ओळखून अनेक भविष्यात काम करणारे कार्यकर्ते हे शरद पवार साहेबांसोबत आहेत आणि तेच दाखवण्यासाठी आजची शहर कार्यकारणी बैठक होती.

या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती: त्या बैठकीला अंकुश काकडे, प्रशांत जगताप यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते. मी स्वतः शरद पवारांसोबत आहे असे सुद्धा प्रशांत जगताप यांनी म्हटलेले आहे. कालच्या पद्धतीने शरद पवारांचा सत्कार होत होता त्यानुसार साहेबांचे विचार हाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा?: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षातील काही आमदारांसह सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी 25 ते 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा आहे. मात्र नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच सह्या केलेल्या आमदारांची नावे देखील अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis Update : कोई मुझे धोखा देता है तो मैं याद रखता हूं, समय का इंतजार करता हूं- देवेंद्र फडणवीस
  2. Sharad Pawar Photo Permission : परवानगीशिवाय फोटो वापरू नका; शरद पवारांची थेट तंबी
  3. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कोणाची? खरा प्रतोद कोण? विधानसभा अध्यक्ष म्हणतात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.