पुणे - मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या चोवीस तासात पुन्हा चांगली हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या चोवीस तासात चांगला पाऊस झाला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला आहे.
हेही वाचा-पावसामुळे ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता धरणातून 27 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा-पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त
गेल्या चोवीस तासात खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात 19 मिलिमीटर, पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात 71 मिलिमीटर, वरसगाव धरण पाणलोट क्षेत्रात 70 मिलिमीटर तर टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात 83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे पुणे शहरातील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.
हेही वाचा-श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी कलाकारांची रिघ