ETV Bharat / state

Vikhe Patil Criticized Sharad Pawar: शरद पवारांचा राजकारणासाठी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न- राधाकृष्ण विखे पाटील - राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil Criticized Sharad Pawar : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय. ते म्हणाले की, शरद पवार राजकारणासाठी लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

Vikhe Patil Criticized Sharad Pawar
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 9:27 PM IST

विखे पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे Vikhe Patil Criticized Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. याचे पडसाद आत्ता राज्यभर उमटू लागले आहेत. राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. तर विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार टिका केली जातेय. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारवर हल्ला केलाय. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत त्यांचं मत व्यक्त (Radhakrishna Vikhe Patil on Lathicharge) केलंय. ते म्हणाले की, राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. लाठीचार्जचं कोणीच समर्थन करत नाही. ज्या लोकांनी आरक्षण घालवलं तीच मंडळी आज याबाबत राजकारण करत आहेत. त्यांचे नेते समाजाला भडकवण्याचे काम करत असल्याची टिका यावेळी पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलीय.

राजकारणासाठी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न : पुण्यातील सर्किट हाऊस येथे कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. एखाद्या दुष्काळाच्या ठिकाणी जाऊन भेट देणे, एक वेगळी गोष्ट आहे. पण त्यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती. आज राजकारणासाठी जाऊन लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी अपेक्षा त्यांच्याकडून नाहीये, असं देखील यावेळी विखे पाटील यांनी म्हटलंय. (lathi charge on maratha)

मराठा समाजाला आरक्षण : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर विखे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा शरद पवार यांना नैतिक अधिकार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे फडणवीस यांनी केलंय. पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे कधी प्रयत्न केले आहेत का, हे त्यांनी सांगावं. मराठा समाजाचं आरक्षण घालावलं म्हणून उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता, असं देखील यावेळी विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात आरक्षण गेलं : उद्धव ठाकरे हे देखील आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यावर विखे पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी याबाबत खुलासा केला पाहिजे, की महाविकास आघाडीच्या काळात कोणामुळे आरक्षण गेलं. तुम्ही जे आरक्षण घालवलं आहे. ते देण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं देखील यावेळी पाटील म्हणाले. (Lathicharge on Maratha Protesters in Jalna)

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, लाठीहल्ल्यामुळं राजकारण तापलं
  2. Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सरकार यांनीच मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला, बावनकुळेंचा आरोप
  3. Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठीचार्ज; राज्यभरात मराठा समाज आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.