ETV Bharat / state

वरुथिनी एकादशी निमित्ताने संत ज्ञानेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट..

वरुथिनी एकादशीचे औचित्य साधत आळंदी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान च्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आज फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून रंगेबीरंगी विविध फुलांच्या माध्यमातून गाभारा आणि समाधी स्थळावर फुलांचा सुगंध दरवळत आहे परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये त्यामुळेच भाविकांचा मंदिर परिसरातील ही लोभनीय सजावट पाहण्यास मुकत आहेत..

आकर्षक फुलांची सजावट
आकर्षक फुलांची सजावट
author img

By

Published : May 7, 2021, 12:25 PM IST

आळंदी - वरुथिनी एकादशीचे औचित्य साधत आळंदी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आज फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी विविध फुलांच्या माध्यमातून गाभारा आणि समाधी स्थळावर फुलांचा सुगंध दरवळत आहे. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळेच भाविकांचा मंदिर परिसरातील ही लोभनीय सजावट पाहण्यास मुकत आहेत.

आळंदीत आकर्षक फुलांची सजावट
वरुथिनी एकादशीचे महत्व...

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी म्हणजे वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना प्रिय आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या सुटतात अशी श्रद्धा आहे. जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे.

एकादशी उपवास ठेवणार्‍या लोकांना काही नियम पाळावे लागतात. धार्मिक शास्त्रांमध्ये एकादशीच्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. ही कामे केल्याने शुभ फळ प्राप्त होत नाही.

वरुथिनी एकादशी निमित्त सजावट
वरुथिनी एकादशी निमित्त सजावट
काय आहेत नियम...१) भात खाऊ नये२) दिवसा झोपू नये३) लसूण, कांदा, मांसाहार, मसूरची डाळ इत्यादी गोष्टी खाऊ नयेत.४) एकादशीला तुळशीची पाने तोडू नये५) वृद्धांचा आदर करावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.